महाराष्ट्र मुंबई

ईडीच्या नोटीसवर मनसेची पत्रकार परिषद; म्हणाले…

मुंबई | राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणी ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. यानंतर मनसे नेते बाळा नांदगावर यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत घेतली आहे. 22 तारखेला शांततेत ईडी कार्यालयात जाणार असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.

सरकारने शांत डोक्याने नोटीस पाठवली आहे. आम्हालाही आता शांत डोक्यानेच सामना करावा लागणार आहे, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंना ईडीने 22 तारखेला साडे अकाराच्या सुमारास बोलावलं आहे, त्या दिवशी मनसेचे सर्व कार्यकर्ते शांततेत ईडी कार्यालयाबाहेर जमा होतील, असं नांदगावर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आम्हाला पूर्ण कल्पना आहे की कार्यकर्ते पक्षाच्या आदेशाच्या बाहेर जाणार नाहीत. त्यामुळे सर्व काही शांततेत होईल, असं बाळा नांदगाकवर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-10 दिवसांपूर्वीच सांगितलं होतं, राज ठाकरेंना वाचवा- प्रकाश आंबेडकर

-भाजपच्या खटारा गाडीत अनेक जण कोंबले जात आहेत- धनंजय मुंडे

-आयसिसचे पाच दहशतवादी भारतात; देशभरात हायअलर्ट जारी!

-पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांचा पत्ता कट???

-नाना पाटेकर अमित शहांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या