बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फडणवीसांनंतर एकनाथ खडसे आणि उदय सामंत शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना ऊधाण

मुंबई | भाजपचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यासंदर्भात फडणवीस यांनी स्वत: माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन फडणवीस यांनी पवारांची ‘सदिच्छा’ भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर एकनाथ खडसे आणि उदय सामंत यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं आता पुन्हा राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सिल्वर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कोकण दौऱ्यावर असताना उदय सामंत यांची भेट घेतली होती. त्यानंतर निलेश राणे यांनी दोघांच्यात गुप्त भेट झाल्याचं सांगितलं होतं. यावर उदय सामंत यांनी आरोपाचं खंडण देखील केलं होतं.

त्यानंतर मंगळवारी फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यात खडसे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. एकनाथ खडसे आणि फडणवीस यांच्यात बोलणं झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं. फडणवीस यांच्या भेटीनंतर एकनाथ खडसे आणि उदय सामंत यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट कोणता राजकीय संकेत देत आहे, असा सवाल विचारला जात आहे.

दरम्यान, उदय सामंत यांच्यासोबत शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली असून शस्त्रक्रियेपश्चात त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. त्यांच्या या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

लग्नात नवरा पोहोचला दारुच्या नशेत, हार घालताना समोर पत्नी दिसलीच नाही अन्…

साताऱ्यात 8 वर्षीय मुलीला चालत्या ट्रेनमधून दिलं फेकून, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

दुर्दैवी! लोककलावंत कांताबाई सातारकरांसह 8 दिवसात कुटुंबातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू

रूग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टरला अमानुषपणे मारहाण, पाहा व्हायरल व्हिडीओ

खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 24 दुकानदारांवर गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More