उपोषणानंतर अण्णा हजारेंची तब्येत बिघडली; अहमदनगरमध्ये उपचार सुरु

उपोषणानंतर अण्णा हजारेंची तब्येत बिघडली; अहमदनगरमध्ये उपचार सुरु

अहमदनगर | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची तब्येत बिघडल्यामुळं त्यांना अहमनगरमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अण्णा हजारेंनी काही दिवसांपूर्वी लोकपाल आणि अन्य मागण्यासांठी उपोषण केलं होतं.

अण्णा हजारेंनी उपोषण सोडल्यानंतर 13 फेब्रुवारीपासून त्यांना थकवा जाणवू लागला होता. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेनंतर अण्णांना अहमदनगरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.

अण्णा हजारेंच्या वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट नॉर्मल आला मात्र अधिक तपासणी करण्यासाठी त्यांना नोबेल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं.

दरम्यान, अण्णा हजारे यांच्यावर नोबेल हॉस्पिटलचे डॉ.बंदिष्टी आणि डॉ.कांदेकर उपचार करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृषी विकास परिषदेतील सेवानिवृत्त नायब तहसीलदारांच्या अश्लील डान्सचा व्हीडिओ व्हायरल

-अजित पवारांनी घेतली मोठी जबाबदारी; यश मिळणार का???

-पंतप्रधान भाजपचा होणार असेल तर मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला पाहिजे- संजय राऊत

अभिनेत्री मधुबाला यांच्या जयंतीनिमित्त गुगलकडून आदरांजली

…तर 2019 मध्ये एनडीएतल्या मित्रपक्षांना मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल- संजय राऊत

Google+ Linkedin