पार्थ पवारांबाबत ‘ती’ गोष्ट ऐकून राजकारणात मोठी खळबळ

मुंबई | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत महत्वाची आणि आश्चर्यकारक माहिती समोर आलीय. राष्ट्रवादीचे(NCP) नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांचे(Ajit Pawar) सुपुत्र पार्थ पवार(Parth Pawar) सध्या राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशा चर्चा रंगायला कारणही तसं स्ट्राॅंग आहे. कारण त्यांनी शिंदे गटातील एका बड्या नेत्याची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केलीये. आता पार्थ पवारांनी शिंदे गटातील नेत्याची भेट का घेतली?, ते राष्ट्रवादीत पार्थ पवार अस्वस्थ असायला नेमकी काय काय कारण असू शकतात. यावर पार्थ पवारांची प्रतिक्रिया काय आणि संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे. हेच आपण आता सविस्तर जाणून घेऊयात.

पार्थ पवार 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत मावळ मतदार संघातून उभे राहिले होते. त्यांना उमेदवारी मिळाली खर पण त्याचवेळी पार्थ पवार नाराज होण्यासारख्या अनेक गोष्टी घडल्या. ज्यावेळी पार्थ पवार मावळ मतदारसंघातून निवडणुक लढवणार हे शरद पवारांनी(Sharad Pawar) स्पष्ट केलं. त्यावेळी रोहित पवारांनी फेसबुकवर पोस्ट करत शरद पवरांनी या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. त्यावेळी पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळं पवार कुटुंबात राजकीय सत्तासंघर्ष सुरू झाला आहे, असं म्हणलं जातं होतं. त्यावेळी पार्थ पवार रोहित पवारांवर नाराज असणार हे तर साहजिकच आहे.

पार्थ पवारांनी ही निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत पार्थ पवारांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी मोठ्या मतांनी पराभूत केले. त्यामुळं पार्थ पवार आणखीणच नाराज झाले असावेत.

आता मी तुम्हाला हे सगळं सांगितलं कारण नुकतीच पार्थ पवारांनी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतलीये. पार्थ पवारांनी शंभूराज देसाईंचा शासकीय बंगला असलेल्या पावनगडवर जाऊन देसाईंची भेट घेतली. भेटीदरम्यान या दोघांत पंधरा ते वीस मिनिटे चर्चा झाली.

आता या भेटीबाबात गोपीचंद पडळकर यांनी मोठा राजकीय दावा करत सर्वांनाच बुचकळ्यात पाडलंय. पार्थ पवार राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत. लोकसभेत त्यांचा पराभव झाला होता. या पराभावामुळं ते राजकीय स्थिरतेच्या शोधात आहेत, म्हणून त्यांनी देसाईंची भेट घेतलीये, असं पडळकरांनी सांगितलंय. जर पडळकरांचं वक्तव्य खरं ठरलं आणि पार्थ पवार खरच पक्षांतर करण्याच्या विचारात असले तर हा राष्ट्रवादीसाठी तसेच पावर कुटूंबासाठी मोठा धक्का असणार आहे. या सगळ्यात अजित पवारांचं काय होईल. ते छाती ठोकून सांगतात की पवार कुटुंब कधीच फुटणार नाही आणि जर त्यांच्या लाडक्या लेकाने राजकीय खेळी केली तर अजित पवार अडचणीत सापडू शकतात. पण पार्थ पवारांनी या भेटीवर स्पष्टीकरण देताना काही खासगी कामांसाठी देसाईंची भेट घेतली असं सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-