बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुलाची कैफियत ऐकल्यानंतर अजित पवार झाले भावुक; एक फोन फिरवला अन्…

बारामती | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानला भेट देत असतात. त्यात ते नागरिकांसोबत गप्पा मारत स्थानिकांचे प्रश्न समजुन घेतात. असाच एक प्रकार शनिवारी घडला. विद्या प्रतिष्ठानला अजित पवारांनी भेट दिली. त्यावेळी अनेक लोक त्याठिकाणी अजित पवारांना भेटण्यास इच्छूक होते. त्यावेळी एका मुलानं आपली समस्या अजित पवारांना सांगितली. त्यानंतर अजित पवार भावूक झालेले दिसले.

माझ्यावर 15 लाखांचं कर्ज झालं आहे. वडिलांच्या डोळ्यावर उपचार करायचे, पण आता पैसे नाहीत, माझ्यापुढे आत्महत्येशिवाय पर्यायच नाही. आम्ही दोघे भाऊ शिकत काम करुन उदरनिर्वाह करतोय, गेले 23 दिवस झाले वडिलांसाठी आम्ही संघर्ष करतोय, पण यश येत नाही. पैशांअभावी वडिलांचा एक डोळा अगोदरच गेलेला आहे, आता दुसरा डोळा वाचविणं गरजेचं आहे, दोन दिवसांपूर्वी वडिलांना डिस्चार्ज देणार होते. पण बिल भरता येत नसल्यानं त्यांना हॉस्पिटल सोडत नाही, अशी कैफियत एका मुलाने अजित पवार यांच्यासमोर मांडली.

मुलाची ही कैफियत ऐकल्यानंतर स्वत: अजित पवारही काहीसे भावुक झाले. त्यांनी तातडीने त्यांचे स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांना ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना फोन लावायला सांगितला. उपमुख्यमंत्र्यांनी डॉ. लहाने यांना या युवकाला हवी असलेली औषधे उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्यानंतर डॉ. लहाने यांनीही ही औषधे काही वेळातच उपलब्ध केली.

दरम्यान, रुग्णाला ही औषधे मिळावी यासाठी खुद्द अजित पवारांपासून ते डॉ.तात्याराव लहाने, सुनीलकुमार मुसळे, सुरेशसिंग गौड, अशोक केदार आणि निशांत कसबे या सर्वांनी प्रयत्न केल्यानं एका गरजू रूग्णाला मदत पोहचली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘ग्रामीण भागात लस मिळेना’; शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

बुधवार पेठेत महिलेची हत्या केलेल्या आरोपीला अटक, ‘असा’ होता कट

लूडो गेम खेळण्याच्या बहाण्याने 55 वर्षीय नराधमाने 2 अल्पवयीन मुलींसोबत केलं ‘हे’ दुष्कृत्य

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; चांदिवाल समितीला दिवाणी अधिकार

‘या’ जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या साडेसात हजारांवरून थेट 3 हजारांवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More