नवी दिल्ली | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांसाठी देशात लॉकडाउनची घोषणा केली. लॉकडाउनचा आज 9 वा दिवस असून पंतप्रधान मोदींनी आज जनतेशी संवाद साधला.
मोदींनी 5 एप्रिल रोजी रात्री सर्व भारतीयांनी घरातील लाईट प्रकाशदिवे बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचे आवाहन केलं. यानंतर केंद्रिय मंत्रिमंडळाची मोदींसोबतची बैठक पार पडल्यावर मोदींनी विविध खेळातील 40 खेळाडूंशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला आहे.
बीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, माजी खेळाडू जोगींदर शर्मा आणि युवराज सिंह यांच्यालह अजून इतर खेळाडूंशी मोदींनी संवाद साधला आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदींनी काय संवाद साधला हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कदाचित क्रिकेटपटूंनाही आपल्या चाहत्यांना कोरोनाबद्दच्या आवाहनाबद्दल जनजागृती करण्यास सांगितलं असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
‘मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही’ असं म्हणणारे मौलाना साद आता म्हणतात…
दिल्लीसारखा महाराष्ट्रातही होणार होता तबलिगीचा कार्यक्रम; गृह विभागाच्या सतर्कतेनं धोका टळला
महत्वाच्या बातम्या-
5 एप्रिलला मला तुमची 9 मिनिटे द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील 9 मुद्दे “
…वाटलं होतं मोदी काहीतरी पाऊल उचलतील पण त्यांच्याकडे ‘थाळी टाळी आणि दीपावली’ शिवाय काहीच नाही”
5 एप्रिलच्या रात्री 9 वाजता घरातल्या लाईट बंद करा आणि दरवाजात दिवे लावा अन् कोरोनाला पळवा- मोदी
Comments are closed.