बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! चौकशीनंतर अखेर शाहरूख खानच्या मुलाला NCB कडून अटक

मुंबई | मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणाबाबत मोठी अपडेट समजत आहे. या प्रकरणात प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानच्या मुलाला NCBने अटक केली आहे. आर्यन खानसह आणखी तीन जणांना याप्रकरणी अटक केली आहे. अटक केलेल्या सर्वांना वैद्यकीय चाचणीसाठी मुंबईतील जे. जे. रूग्णालयात नेण्यात येणार असून त्यानंतर त्यांना न्यायालयात उभं केलं जाणार असल्याचं समजत आहे.

आर्यन खानला कोर्टामध्ये हजर केल्यावर त्याला पोलीस कोठडीची मागणी NCB करणार आहे. त्यामुळे आता न्यायालय काय निकाल देत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शनिवारी रात्री टाकलेल्या धाडीत एनसीबीनं 10 जणांना ताब्यात घेतलं होतं.

मात्र रात्री त्यांनी कोणाला ताब्यात घेतलं हे सांगितलं नव्हतं. शाहरुखच्या मुलाचं नाव समोर आलं होतं त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याची एनसीबीकडून त्याची चौकशी सुरु होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एनसीबीने आर्यनचा फोन जप्त केला आणि त्याचं चॅट ही तपासलं आहे.

दरम्यान, सध्या समीर वानखेडे यांच्यावर कौतुकांचा वर्षाव पहायला मिळत आहे. आतापर्यंत समीर वानखेडे यांनी बऱ्याच बड्या कलाकारांच्या घरावर धाड टाकली आहे.

थोडक्यात बातम्या- 

शाहरूख खानच्या अडचणी वाढल्या! ड्रग्ज प्रकरणात आर्यनने केला मोठा खुलासा म्हणाला; मी ड्रग्ज…

‘ते शिवसेनेत, मी काॅंग्रेसमध्ये आहे मग…’; साबणेंच्या आरोपावर अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर!

पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जींचा मोठ्या मताधिक्याने विजय!

शाहरुखच्या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर सचिन वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शाहरुखच म्हणाला होता, “माझ्या मुलानं ड्रग्ज घ्यावेत, पोरींच्या मागं जावं, सेक्स करावा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More