बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘जयललिता’ नंतर आता ‘इंदिरा गांधी’च्या भूमिकेत झळकणार कंगना रणौत

मुंबई | बाॅलिवूडची पंगा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. कंगना नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. ती नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्य, बेधडक बोलणं, यामुळे चर्चेचा विषय बनत असते. यातच कंगना आता एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आली आहे.

कंगना रणौत लवकरच भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत झळकणार आहे. ती इंदिरा गांधी यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. अलीकडेच या चित्रपटाविषयी बोलताना कंगनाने सांगितलं की, ती लवकरच इंदिरा गांधीच्या भूमिकेत दिसणार आहे. पण हा चित्रपट त्यांचा बायोपिक असणार नाही, हा एक ग्रँड पीरियड ड्रामा चित्रपट असेल. यामध्ये राजकारणाबद्दल बराच ड्रामा असेल.

हा चित्रपट पाहणं माझ्या पिढीला सध्याची भारताची सामाजिक-राजकीय परिस्थिती समजण्यास सुलभ करेल, असंही कंगनानं म्हटलं. आता कंगनानं तिच्या सोशल मीडियावरही चित्रपटाची एक छोटीशी झलक दाखवली आहे.

दरम्यान, आम्ही ठरवलेलं ध्येय स्क्रीनवर साकारण्यासाठी अनेक अद्भुत कलाकार एकत्र आले आहेत. हे खूप स्पेशल असेल. आज आम्ही बॉडी, फेस स्कॅन व कास्टची तयारी सुरू केली. जेणेकरून लुक एकदम परफेक्ट येईल, असं म्हणत कंगनानं ती या भूमिकेसाठी खूपच उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

थोडक्यात बातम्या –  

रिलायन्सच्या 20 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार मोफत लसीकरण!

चिंता वाढली! देशातील कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वाढ; पाहा आकडेवारी

“मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे”

मुलासमोर गांजा ओढायचे इरफान खान?; व्हायरल फोटोवर बाबीलनं दिलं उत्तर, म्हणाला….

“चेहरा भोळा आणि भानगडी सोळा, असं राज्यातील सरकार आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More