देश

जेट एअरवेजनंतर आता एअर इंडियाही अडचणीत येण्याची शक्यता!

नवी दिल्ली | आर्थिक विवंचनेत असलेल्या जेट एअरवेजने आपली सर्व उड्डाणे रद्द केली होती. आता राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाही मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एअर इंडियावर एकूण 29000 कोटीचे कर्ज आहे. त्यातील 9000 कोटी कर्जाची परतफेड कंपनीला मार्च 2020 पर्यंत करायची आहे. मात्र या कालावधीत इतकी रक्कम जमा करणे कंपनीला जड जाणार आहे.

बालाकोट येथील सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारतीय विमानांना त्यांच्या हद्दीतून उडण्यास मनाई केली आहे. आंतरराष्ट्रीय फेऱ्यांना यामुळे मर्यादा आल्या आहेत.

पाकिस्तानी क्षेत्र टाळून जाण्यासाठी लांबचा फेरा पडतो आहे. या एकाच कारणामुळे एअर इंडियाला दररोज 6 कोटी तोटा होतो आहे. त्यामुळे कंपनीने मदतीसाठी वित्त मंत्रालयाला साकडे घातले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटपटूंनी केलं लग्न

-रोमॅंटिक गाण्याप्रकरणी माफी मागा; शिवसेनेची अमोल कोल्हेंकडे मागणी

-मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्यात मोदी ‘एक्सपर्ट’- प्रकाश आंबेडकर

-मी लहानपणी कोंबड्यांची अंडी विकायचो, हे दरवेळेस सांगत फिरु का?- अजित पवार

-मोठ्या संख्येने उपस्थित राहून राहुरीकरांनी माझ्यावरील प्रेम सिद्ध केलं- सुजय विखे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या