बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कल्पना चावलानंतर ‘ही’ भारतीय तरुणी घेणार अंतराळात झेप

नवी दिल्ली |भारतीय तरुणी सिरीशा बादला आता लवकरच आंतराळात उड्डाण घेणार आहे. कल्पना चावला नंतर सिरीशा ही दुसरी मुलगी आहे जी आंतराळात उड्डाण घेणार आहे. यानंतर सर्व भारतीयांचे या उड्डाणाकडे लक्ष वेधून आहे.

येत्या 11 जुलै रोजी न्यू मॅक्सिको येथून उड्डाण होणार आहे. सिरिशा अंतराळात संशोधन विभागाची जबाबदारी सांभाळणार आहे. अंतराळ मोहिमेवर जाणाऱ्या सहा जणांच्या पथकात दोन महिलांचा समावेश आहे. सिरिशासोबत आणखी एक बेश मोसिस या महिला शास्त्रज्ञाचा समावेश आहे.

34 वर्षीय सिरिशा या अॅरोनॉटिकल इंजिनिअर आहेत. इंडियानाच्या पर्ड्यू विश्वविद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. कल्पना चावला यांच्यानंतर अंतराळात झेप घेणाऱ्या त्या दुसऱ्या भारतात जन्मलेल्या महिला ठरणार आहेत. दरम्यान आतापर्यंत चार भारतीय अंतराळात गेले आहेत.

दरम्यान, सिरीशाने केलेल्या ट्विटनुसार तिला युनिटी 22 क्रू आणि कंपनीचा एक भाग होणार असल्याची गोष्ट तिच्यासाठी अतिशय अभिमानास्पद असल्याचं तिनं म्हटलं आहे. सिरिशा बांदला यांचा जन्म भारतात आंध्रप्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात एका गावात झाला होता. तर टेक्सासच्या ह्यूस्टनं येथे त्यांचं शालेय शिक्षण झालं आहे.

पाहा फोटो:

 

View this post on Instagram

 

A post shared by Sirisha Bandla (@sirishabandla)

थोडक्यात बातम्या-

नाना पटोलेंच्या ‘त्या’ खळबळजनक पत्राबद्दल नितीन राऊतांचा मोठा खुलासा!

देशांतर्गत सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 4 लाखापार,वाचा आकडेवारी

‘कसौटी जिंदगी की’ फेम अभिनेता प्राचीन चौहानला तरुणीची छेड काढल्याप्रकरणी अटक

कौतुकास्पद! नवविवाहीत जोडप्याने आहेराच्या पैशातून केलं गरिबांना धान्य वाटप

“यापुढे त्रास दिला तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More