बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलदार ‘केकेआर’! पॅट कमिन्सनंतर केकेआरच्या आणखी एका खेळाडूने केली मदत

मुंबई | कोरोनाने देशात सध्या गंभीर अवस्था होत चालली आहे. दिवसेंदिवस कोरोनामुळे अनेकजण आपला जीव गमावत आहेत. कोरोना तांडव करत असताना ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठी समस्या भारतीयांसमोर निर्णाण झाली आहे. यासाठी अनेक नेते, अभिनेते, उद्योजक पुढे येऊन काही ना काही मदत करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर आयपीएलमधील कोलकाता संघातील पॅट कमिन्सने मदत केली होती. त्या पाठोपाठ त्याच्याच संघ सहकारी शेल्डन जॅक्सनने पुढे येत मदत केली आहे.

जॅक्सननं गौतम गंभीर फाऊंडेशनला आर्थिक मदत केली आहे. मात्र त्याने आपण दान केलेली रक्कम ही जाहीर केली नाही. त्यासोबतच त्याने सोशल मीडियावरून अन्य खेळाडूंनाही मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. याबाबत पोस्टद्वारे त्याने माहिती दिली.

या संकट काळात अनेकांच्या वेदना पाहून माझं मन रडत आहे. चांगले दिवस लवकर येऊ दे,  अशी प्रार्थना देवाकडे करतो. सरकारनं आखलेल्या सर्व नियमांचे पालन करा, अशी विनंती मी सर्वांना करतो. कृपया घरीच थांबा आणि जेव्हा बाहेर जाताल तेव्हा न विसरता मास्क घाला. कोरोनाशी सामना करण्यासाठी कार्यरत असलेल्या गौतम गंभीर फाऊंडेशनला मी माझ्याकडून मदत केली आहे. मी इतरांनाही मदतीचं आवाह करतो, असं शेल्डन जॅक्सनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान,पॅट कमिन्सने 50 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे जवळपास 30 लाख रुपयांची मदत पीएम केअर फंडाला दान केले होते. कमिन्सने खेळाच्या पलीकडे जाऊन भारतीयांची मनं जिंकली आहेत. त्यासह त्याने इतर खेळाडूंनाही मदतीसाठी आवाहन केलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

येत्या 48 तासात राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पाऊसाची शक्यता, हवामानाचा खात्याचा शेतकऱ्यांना अलर्ट!

ज्युलिओ रिबेरोंच्या टिप्पणीवर फडणवीसांचं ओपन लेटर; म्हणाले, “माझ्या हातून….”

गर्भवती महिलेला स्ट्रेचर न मिळाल्याने धडपड करणाऱ्या डाॅक्टरांचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

“तुम्ही कॅशियर म्हणून जॉईन व्हा, उपाध्यक्ष होऊ शकता अट एकच…”, नेटकऱ्याच्या ट्विटकर अमृता फडणवीस भडकल्या

धक्कादायक! ‘या’ जिल्ह्यातील कृत्यानं महाराष्ट्र हादरला एकाच रुग्णवाहिकेत कोंबले ‘इतक्या’ रुग्णांचे मृतदेह

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More