बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी राजीनामा देतोय पण, माझं मन…’; बाबुल सुप्रियोंच्या सेकंड इनिंगची सुरूवात

नवी दिल्ली | गेल्या महिन्यात भाजप नेते बाबुल सुप्रियो यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. यावेळी त्यांनी कोणत्याच पक्षात प्रवेश करणार नसल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अशातच आता बाबुल यांनी खासदारकीचा देखील राजीनामा दिला आहे.

आपल्या राजीनाम्याबद्दल बोलताना भाजपमधून माझ्या करिअरला सुरुवात झाल्याने माझं मन खूप भावूक झालं आहे, मी पंतप्रधान, भाजपाध्यक्ष आणि अमित शाह यांचे आभार मानतो, त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, असं देखील बाबुल म्हणाले.

बाबुल यांनी खासदारकीचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे. यावेळी मी पुर्णपणे राजकरण सोडत आहे, जर मी पक्षाचा भाग नाही तर ही जागा ठेवणं योग्य नाही, असं बाबुल यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारावेळी राजीनामा द्यावा लागल्याने बाबुल सुप्रियो हे नाराज होते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. त्यातच बाबुल सुप्रियो यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपण राजकारणाला कायमचा अलविदा करत असल्याचं म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

दोन वर्षात शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना काय मिळालं? निलेश राणेंची शरद पवारांवर जळजळीत टिका

‘तुम्ही पेट्रोल मला द्या ना…’, पेट्रोलपंपावर गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

‘या’ वर्षीही भेटणार वाहतूक करात सवलत?; ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

विमानाचा रंग पांढराच का असतो?, ‘हे’ आहे त्यामागचं विशेष कारण

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी राहणार पाणीपुरवठा पुर्णपणे बंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More