बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकातील सरकार कोसळणार”

बंगळुरु | कर्नाटकात काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलात गोंधळ आणि अंतर्गत गटबाजी सुरु आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर हे सरकार कोसळणार, असं वक्तव्य भाजपचे नेते बी. एस. येडीयुरप्पा यांनी केलं आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांना याआधीच मुख्यमंत्री करायला हवं होतं, असं वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केलं होतं. याला उत्तर म्हणून काँग्रेस नेते सिद्धरामया यांनी कुमारस्वामींपेक्षा त्यांचे बंधु एच. डी. रेवण्णा हे सक्षम मुख्यमंत्री असले असते, असं म्हटलं होतं.

याचा संदर्भ देत येडियुरप्पा यांनी निशाणा साधला आहे. कर्नाटक सरकारमध्ये सध्या विचित्र प्रकार सुरु असल्याचं ते म्हणाले आहेत.

कर्नाटक सरकार जनतेची फसवणूक करत आहे. त्यामुळे जनता त्यांना धडा शिकवेल, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

-श्री श्री गोडसे यांना लवकरच ‘भारतरत्न’ देण्याची मागणी होईल- असदुद्दीन ओवैसी

-“अशा देशभक्तांपेक्षा देशद्रोही म्हणून घेणं अधिक अभिमानाचं”

-नथूराम गोडसे दहशतवादीच होता- प्रकाश आंबेडकर

-भाजपचे 80 कार्यकर्ते मारले गेले, बंगालमधील हिंसेला ममता जबाबदार- अमित शहा

-मोदीं देशाला पुढे घेऊन जातायेत हे दृष्य पाहायला आवडलं असतं- राहुल गांधी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More