बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाकाळात नोकरी गेल्याने पती झाला मेल सेक्स वर्कर, पत्नीला समजताच तिने…

बंगळुरु | कोरोना काळात अनेकांनी आपली नोकरी गमवली आहे. नोकरी गेल्याने अनेकांनी मिळेल ते काम केलं. मात्र बंगळुरु येथे एक अजब घटना समोर आली आहे. कोरोना काळात लागलेल्या लाॅकडाऊन दरम्यान एका पतीने त्याची नोकरी गमवली. त्यानंतर तो सेक्स वर्कर म्हणून काम करु लागला. ही बाब त्याच्या पत्नीला समजताच तिने धक्कादायक मागणी केली आहे.

24 वर्षांची तरुणी आणि 27 वर्षांचा तरूण बीपीओमध्ये नोकरीला होते. त्यांची 2017 मध्ये कंपनीच्या कॅन्टीनमध्ये भेट झाली आणि ते प्रेमात पडले. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर दोघेही बंगळुरूमध्ये भाड्याच्या घरात राहात होते. पण लॉकडाऊनमुळे या तरुणाची नोकरी गेली. त्यानं नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याला नोकरी मिळाली नाही. काही दिवसांनी पत्नीला शंका आली की नवरा बराचवेळ लॅपटॉपवर असतो आणि फोनवर बोलत असतो. त्यामुळे तिने चौकशी केली. मात्र त्याने तिला काहीही सांगितलं नाही.

तरुणीने आपल्या भावाच्या मदतीने नवऱ्याचा लॅपटॉप उघडून पाहिला. त्यानंतर तिच्या नवऱ्याचे अनेक महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीतील फोटो आढळले. तरीही ते फोटो आपले नाहीत असाच तो दावा करत होता. मात्र नंतर त्याने मान्य केलं की तो मेल एस्कॉर्ट म्हणून काम करतो. बंगळुरू शहरात त्याच्या अनेक क्लायंट असून त्यांच्याकडून तो एकावेळचे 3 ते 5 हजार रुपये कमवतो.

दरम्यान, हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांच्या वुमन्स हेल्पलाइनशी संपर्क साधला. नवऱ्यानी हे नवं काम आपल्याला आवडत असलं तरीही बायकोवर खूप प्रेम असल्याचं सांगितलं आहे. तिला सोडायची त्याची इच्छा नसून यापुढे तो मेल सेक्स वर्कर म्हणून काम करणार नाही, असंही त्यानं मान्य केलं. मात्र पत्नीचा विश्वासघात झाल्याने तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिने कोर्टात त्यासंबंधी अर्ज देखील दाखल केला आहे.

थोडक्यात बातम्या-

WHO प्रमुखांच्या ‘या’ वक्तव्यानं जगाचं टेन्शन वाढलं, म्हणतात…

माझी नाही तर कोणाचीच नाही म्हणत त्याने तरूणीसोबत केलं धक्कादायक कृत्य!

उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांंना जितेंद्र आव्हाडांचा टोला, म्हणाले…

गर्भवतीला रस्त्यातच सुरू झाल्या प्रसुतीकळा; मुंबई पोलिसांच्या गाडीतच महिलेनं दिला बाळाला जन्म

“एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र माझा?, मुख्यमंत्र्यांंनी जरा विचार करून बोलावं”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More