बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पराभवानंतर विराट कोहली म्हणतो, “स्पर्धा अजून संपलेली नाही, आता…”

मुंबई | टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने भारताचा पराभव केला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता भारतीय संघाची जवळपास संपुष्टात आली आहे. न्यूझीलंडविरूद्ध सामना कोणत्या कारणांमुळे गमवला आहे. त्याबद्दल कर्णधार विराट कोहलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जेव्हा आम्ही सुरूवातीला फलंदाजी करण्यास मैदानात उतरलो तेव्हा आमची देहबोली कमकुवत होती. आमचे सुरूवातीचे फलंदाज चांगली कामगिरी करण्यास असफल ठरले. न्यूझीलंड संघाने आमच्यावर पहिल्यापासून दबावाखाली ठेवला. जेव्हा जेव्हा आम्ही नवीन शॉट मारायला गेलो तेव्हा आमचे फलंदाज बाद झालेत. त्यामुळे आम्हाला शेवटपर्यंत काहीच करता आलं नाही, असं विराट कोहली म्हणाला.

जेव्हा तुम्ही भारतीय क्रिकेट संघाकडून खेळत असता तेव्हा चाहत्यांकडून खूप अपेक्षा असते. लोक आमचा खेळ बघण्यासाठी मैदानात येत असतात. भारतीय खेळाडूंनी या सर्व गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे आणि यातून मार्ग काढला पाहिजे. आम्ही दोन्ही सामन्यात असे काहीच केलं नाही म्हणून आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. आम्हाला सकारात्मक होऊन आणि दबावातून बाहेर येऊन आपला खेळ करावा लागणार आहे. तसेच स्पर्धा अजूनही संपलेली नाही, असंही विराट म्हणाला.

दरम्यान, भारताचा सुरूवातीला पाकिस्तानने 10 गडी राखून पराभव केला. त्यानंतर न्यूझीलंडने भारतीय संघाचा 8 गडी राखून पराभव केला. त्यामुळे जर अफगाणिस्तान संघाने आगामी सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला तर उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या आशा अजून भारताकडे आहेत.

थोडक्यात बातम्या- 

“हमाम में सब नंगे है कारण, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी…”

नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झालाय- प्रविण दरेकर

’46 रेल्वेस्थानकावर बाँम्बस्फोट’; रेल्वे सुरक्षा दलाला आलेल्या धमकीच्या पत्राने खळबळ

“नवाब मलिक याचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करा”

“एवढं गलिच्छ राजकारण ठाकरे-पवारच करू शकतात, नवाब मलिकांची एवढी कॅपेसिटी नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More