Top News देश

संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख; म्हणाले…

नवी दिल्ली | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन झालं आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या निधनानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ट्विट करत, मोदी म्हणाले की, “मा. गो. वैद्य हे अत्यंत नामांकित लेखक आणि पत्रकार होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात त्यांनी कित्येक दशके महत्वपूर्ण योगदान दिले. भाजपला अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी योगदान दिले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायक आहे. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांप्रती मी माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती.”

मा. गो. वैद्य यांचं वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. आज दुपारी 3.30 वाजता त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. परखड मतांसाठी ते ओळखले जात होते. ते तरूण भारताचे माजी मुख्य संपादक देखील होते. याशिवाय संघाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं.

दरम्यान, विविध उत्कृष्ट अग्रलेख तसंच विविध विषयांवर भाष्य लिहिणार्‍या मा. गो. वैद्य यांचा पत्रकारिता तसंच समाजसेवेचे अनेक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.

थोडक्यात बातम्या-

शिवसेनेसारखी कामं आपल्याला करायची नाहीत- चंद्रकांत पाटील

महाविकासआघाडीतील अंतर्गत पक्षांतरावर छगन भुजबळ म्हणाले…

लवकरच भाजपला मोठी गळती, भाजपचे काही आमदार राष्ट्रावादीच्या वाटेवर- नवाब मलिक

 “… तर 1000 कोटी रुपये खर्चून नवीन संसद भवनाचा थाट कशासाठी”

“राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये जाऊन काँग्रेसने लाचारी पत्करली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या