Top News कोरोना देश

महाराष्ट्रानंतर ‘या’ राज्यात देखील नाईट कर्फ्यूची घोषणा!

कर्नाटक | ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोना विषाणूसंदर्भात खबरदारी म्हणून महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू लावण्यात आला. यानंतर आता कर्नाटक सरकारनेही राज्यात नाईट कर्फ्यूची घोषणा केलीये.

कर्नाटक सरकारने आदेशाप्रमाणे, नाईट कर्फ्यू आजपासून 2 जानेवारीपर्यंत लागू करण्यात आला आहे. हा नाईट कर्फ्यू रात्री 10 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे.

कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांच्या सांगण्यानुसार, “ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोना व्हायरसपासून सुरक्षा तसंच त्याचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय़ घेण्यात आलाय. याशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर देखील आमचं लक्ष आहे.”

“हा निर्णय सर्वच कार्यक्रमांसाठी लागू आहे. त्यामुळे 23 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत रात्री 10 वाजल्यानंतर कुठल्याही कार्यक्रमाला तसंच उत्सव साजरा करण्याला परवानगी नसल्याचं,” आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय.

थोडक्यात बातम्या-

शेतकरी दिनी बळीराजाला आंदोलन करावं लागतंय हे दुर्दैव- शरद पवार

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मोठा झटका!

“ताडी गंगेच्या पाण्यापेक्षा शुद्ध, ताडी प्यायल्याने कोरोना होत नाही”

…अन्यथा तुर्कीसारखी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही- रोहित पवार

‘राजा इतना भी फकीर मत चुनो की…’; नवजोत सिद्धूंचा मोदींवर निशाणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या