बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनेक स्वप्न पाहता, देव बुडवून बसले, आमची आघाडी मात्र भक्कम- बाळासाहेब थोरात

अहमदनगर |  संगमनेर येथे सहकारी दुध उत्पादक आणि प्रक्रिया संघ याठिकाणी वितरण वाहिकेचा उद्घाटन समारंभ पार पडला आहे.यावेळी काँग्रेस नेते आणि राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, युवासेनेचे अध्यक्ष तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री विश्वजित कदम उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे.

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. अनेक स्वप्न पाहता, देव बुडवून बसले, आमची आघाडी मात्र भक्कम, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांना सोबत घेऊन काम करत आहेत, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

शेतकरी कर्जमाफीवर बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं आहे. कोविडमुळे पुढील कर्जमाफी थांबली आहे, लवकरच ती सुरू करू, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. महाराष्ट्र कोरोनाकाळात सर्वांत चांगले काम करणारे राज्य आहे. आकडे देखील खरे आहेत. मुख्यमंत्री यांचे देशभरातुन झालेल्या सर्व्हेत वरच्या स्थानी नाव असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी यावेळी आदित्य ठाकरे आणि विश्वजित कदम यांचं कौतुक केलं आहे. दोन नेते राज्याचे नेतृत्व करतात, तसे देशाचेही करतील, असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. विश्वजित कदम यांच्याकडे किती आहेत ते एका दमात सांगता येणार नाही, असंही थोरात यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

नवाजुद्दीन सिद्दीकीने ‘या’ कारणामुळे सोडला ओटीटी प्लॅटफॉर्म; चाहत्यांना बसला मोठा धक्का

परमबीर सिंह कुठे गायब आहेत?, ‘या’ नेत्याने दिलं उत्तर

नवाब मलिकांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती हल्ला, गंभीर आरोप करत म्हणाले…

“त्यांनी लवंगी फटाके फोडले, मी 3 जावयांचे दिवाळीत एकदमच बॉम्ब फोडणार”

एमआयएममध्ये फूट?, ‘त्या’ व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More