बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लग्नानंतर अनैतिक प्रेमसंबंध ठेवणं पडलं महागात; आता दोघींसोबत दिवस वाटुन राहावं लागणार

लखनऊ | अनेक वेळा लग्नानंतर देखील अनेकांचे प्रेमसंबंध असल्याच्या घटना समोर येतात. अशातच एक विचित्र घटना समोर आली आहे. मात्र यामध्ये लग्नानंतर देखील प्रेमसंबंध ठेवणं एका पुरुषाला प्रचंड महागात पडलं आहे. संबंधित व्यक्तीला आता त्याच्या गर्लफ्रेंण्डसोबत सुद्धा लग्न करावं लागलं आहे.

संबंधित व्यक्तीचं नाव तकमील अहमद असं आहे. तकमील हा रामपूरच्या डोनकपुरी टांडा गावाचा रहिवासी आहे. तो विवाहीत असून काही वर्षांपुर्वी एका आसामच्या मुलीसोबत फेसबुकवर ओळख झाली होती. या मैत्रीचं रुपांतर काही काळानंतर प्रेमात झालं आणि तरुणी आसामवरुन चंदीगडला आली.

दोघेही चंदीगडमध्ये लिव्ह-ईन रिलेशनशिपमध्ये राहत होते. यादरम्यान तरुणी गर्भवती राहिली असल्याचं समोर आलं. ही बाब तकमीलला समजताच त्यानं आपल्या गावी पळ काढला. यानंतर तरुणीने तिच्या बाळाला जन्म दिला. मात्र आपल्या मुलाला त्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी तरुणी तकमीलच्या शोधात त्याच्या गावी पोहोचली.

दरम्यान, तकमील जवळ पोहोचताच संबंधित घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. यानंतर तकमीलला प्रेयसीसोबत लग्न करावं लागलं असून आता त्याला 3 दिवस एका पत्नीला आणि 3 दिवस दुसऱ्या पत्नीला द्यावा लागणार आहे. विशेष बाब म्हणजे तरुणीला आपला प्रियकर विवाहीत असल्याचं माहित नव्हतं.

थोडक्यात बातम्या-

काय सांगता!!! आता पुरुष देखील प्रेग्नेंट होणार?; वैज्ञानिकांचा अजब प्रयोग यशस्वी

…..म्हणून लसीकरणासाठी WHO ने भारताकडे मागितली मदत

किंग कोहलीने मोडला महेंद्रसिंह धोनीचा हा खास विक्रम; बड्या खेळाडूंना मागे टाकत मिळवलं अग्रगण्य स्थान

नाशिक दुर्घटनेत मुलाच्या मृत्यूनंतर सरकारने दिलेले 10 लाख रुपये घेऊन सून फरार

“कोणी कितीही शड्डू ठोकले तरी पुढील महापौर सुद्धा शिवसेनेचाच होणार”

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More