बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अरे ओ बेटा जी…”; ….म्हणून सेहवागनं प्रिती झिंटाला केलं ट्रोल

मुंबई | आयपीएलचा 10 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कोलकाता नाईट रायडर्सवर 38 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात बंगळुरुच्या ए बी डिव्हिलर्स आणि ग्लेन मॅक्सवेलने धुँवाधार खेळी करत कोलकाता नाईट रायडर्सच्या अडचणीत वाढ केली होती. यावरून भारताचा माजी आक्रमक फलंदाज विरेंद्र सेहवागने पंजाब किंग्ज संघाची मालकीण प्रीती झिंटाला ट्रोल केलं आहे.

सेहवागने ‘लुडो’ या चित्रपटात वापरण्यात आलेल्या ‘अलबेला’ चित्रपटातील गाण्याद्वारे पंजाब किंग्ज संघाची मालकीण प्रीती झिंटाला ट्रोल केलं. मॅक्सवेल याअगोदर किंग्ज एलेव्हन पंजाब संघात खेळायला होता. मॅक्सवेल प्रिती झिंटाला बघुन ‘ओ बेटा जी…..’ हे गाणं म्हणेल, असं सेहवागला सुचवायचं आहे. अखेर मॅक्सवेलला आयपीएलमध्ये त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करताना पाहून आनंद झाला. असं सेहवागने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या दोन विकेट्स लवकर पडल्यानंतर मैदानावर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने आक्रमक खेळी खेळली. त्याने सुरुवातीपासून हळूवार खेळ केला. पण त्यानंतर त्याने फटकेबाजी चालू केली. कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात त्याने 9 चौकार आणि 3 षटकारांसह 49 चेंडूत 78 धावा फटकावल्या. ए बी डिव्हिलियर्सच्या साथीने त्याने शानदार खेळी केली. ए बी डिव्हिलियर्सने देखील 34 चेंडूत 76 धावा केल्या.

दरम्यान, विरेंद्र सेहवाग खुप काळापासून किंग्ज एलेव्हन पंजाबसोबत खेळला होता. त्यावेळी देखील तो प्रिती झिंटाला टोमणे मारायचा. तर पूर्ण आयपीएल हंगामात विरेंद्र सेहवागच्या ट्विटवर सर्वांचं लक्ष असतं. मागील आयपीएल हंगामात विरेंद्र सेहवागचा ‘विरू की बैठक’ हा कार्यक्रम खूप प्रसिद्ध झाला होता.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

“…तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांड्या लावाव्या लागतील”

“कोरोना काळात राजकारण करू नका पण, उद्धवजी हे ऐकतील का?”

“या उपटसोंड्याला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून लोकांचे हाल काय कळणार?”

‘या’ सहा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी मोठी बातमी!

तोंडात कोरोनाचे जंतू टाकतो म्हणणाऱ्या शिवसेना आमदाराला फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More