बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माेठ्या गोंधळानंतर अखेर राज्यपालांनी एमपीएससीच्या तीन सदस्यांची केली निवड!

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तीन सदस्यांच्या रिक्त पदाच्या अधिसुचनेला मान्यता देण्याबाबत सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यावर आज अखेर राज्यपाल भगत सिंह यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. देवानंद बाबुराव शिंदे, डॉ. प्रताप रामचंद्र दिघावकर आणि राजीव रणजीत जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

गेल्या काही वर्षांपासून राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्य निवडीवरून प्रचंड प्रमाणात गाेंधळ चालला होता. त्यातच काही महिन्यांमध्ये स्वप्निल लोणकर या स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरूणाने आत्महत्या केली होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 जुलै पर्यंत सदस्य निवडण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आज तीन सदस्यांची राज्यपाल भगत सिंह कोश्यारी अधिकृत घोषणा जारी केली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या ही केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राबवण्याबाबत विचार चालू आहे. त्या विषयावर भरणे यांनी राज्यपालांसोबत चर्चा केली आहे. काही दिवसातच आयोगाच्या एका सदस्याचा कार्यकाळ संपणार आहे. रिक्त झालेल्या जागांची त्याबाबत ही चर्चा करण्यात आली आहे. या दोन्ही प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असंही राज्यपालांनी सांगितल्याचं भरणे म्हणाले.

दरम्यान, तीन सदस्यांच्या नियुक्तीबाबत भरणे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी एकुण 2 हजार 192 पदांसाठी एकुण 6 हजार 998 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र झाले आहेत. त्यातील 6 हजार 621 उमेदवारांच्या मुलाखती बाकी आहेत. या सदस्या निवडीमुळे भरती प्रक्रियाला वेग येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा आजची आकडेवारी!

राज्यपालांसारखा कर्तृत्ववान, निष्ठावान माणूस मी पाहिलेला नाही- अमृता फडणवीस

खूशखबर! ‘आयडीबीआय’ बॅंकेत इतक्या जागांसाठी मोठी भरती, 18 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत!

रौप्य पदक मिळवत इतिहास रचणाऱ्या रवीकुमार दहियावर बक्षिसांचा वर्षाव; 4 कोटी, गावात स्टेडियम अन्…

‘हा’ पॅक त्वचेला लावा आणि मिळवा सुंदर त्वचा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More