Top News मुंबई

आग्र्यातील संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिल्यावर फडणवीस म्हणाले…

मुंबई | आग्र्यामध्ये बांधण्यात येणाऱ्या संग्रहालयाला मुघलांचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं देणार असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणसवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

योगी आदित्यनाथ यांचं ट्विट रिट्विट करत, जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

गुलीमीची मानसिकता असलेल्या प्रतिक चिन्हांचा नव्या उत्तर प्रदेशमध्ये काहीही स्थान नाही. आपल्या सर्वांचे नायक हे छत्रपती शिवाजी महाराज असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ऐतिहासिक ताजमहालच्या पूर्वेकडील द्वारावर बांधण्यात हे संग्रहालय बांधण्यात येत असून सुमारे दीडशे कोटींचा हा प्रकल्प आहे. योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयाचं राज्यात स्वागत केलं जात असून सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात आदित्यनाथ यांच्यावर नेटकऱ्यांनी स्तुतीसुमने उधळली आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

“गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का केली नाही?”

आग्र्यातील संग्रहालयाला मुघलांचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव- योगी आदित्यनाथ

सावधान! भामट्यांनी पैसे लुटण्याची नवी पद्धत शोधली, पुण्यातील CA तरुणीला सव्वादोन लाखाचा चुना!

भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना पुन्हा कोरोनाची लागण

राज्यात आज 17 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या