बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाना पटोलेंनंतर काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा स्वबळाचा नारा

मुंबई | काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम केलं पाहिजे. उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. आता पुन्हा या भागातून लोकसभा, विधानसभेचे प्रतिनिधित्व वाढवून 2024 मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल यासाठी काम करा, असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनीही नाना पटोले यांच्यापाठोपाठ स्वबळाचा नारा दिला आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवल्या पाहिजेत ही प्रदेशाध्यक्ष पटोले यांची भूमिका रास्तच आहे. पटोले यांची भूमिका हीच पक्षाची भूमिका असून आपले या भूमिकाला समर्थन आहे, असं काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग राज्यात आजही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा अधिकार असून स्वबळावर निवडणुका लढल्यास पक्ष संघटनाही मजबूत होण्यास मदत होईल. राज्यातील पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावरच लढवाव्यात ही भूमिका रास्त आहे, असंही नसीम खान म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार पुर्ण 5 वर्ष टिकणार असल्याचं सांगितलं असलं तरी, आता काँग्रेसच्या बदलती भूमिका महाविकास आघाडीपुढे संकट उभे करण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेचा शेवटचा होकार काँग्रेसचाच होता. त्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत काँग्रेसची काय भूमिका असणार आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“राज ठाकरेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र फार वेगळा आहे, त्यांच्या हाती महाराष्ट्र दिला पाहिजे”

उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

‘कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले, तर…’; अभ्यासातून नवी माहिती समोर

भाई जगतापांची पोलिसांना धक्काबुक्की; भाई जगतापांसह 50 जणांवर गुन्हा

पालकमंत्री छगन भुजबळांना डच्चू?; संजय राऊतांच्या वक्तव्यानं खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More