बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेचाही आर्यनला पाठिंबा?, अरविंद सावंतच्या वक्तव्यानं खळबळ

मुंबई | सध्या मुंबई क्रुझ प्रकरणावरुन देशात खलबतं सुरु आहेत. एनसीबीनं आर्यन खानला अटक केली असून मुंबई न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातच नवाब मलिकांनी या प्रकणावरुन भाजपवर अनेक आरोप लगावले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनाही आर्यनच्या पाठिशी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नवाब मलिक यांच्यानंतर शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी एनसीबीच्या कारवाईवर निशाणा साधला आहे. सीबीआय, ईडी, आयकर या तपास यंत्रणा देशात कोणतंही काम करत नाही. देशात यांच्या कारवाया होत नाही मात्र महाराष्ट्रातच सर्व भ्रष्ट माणसं आहेत अशा पद्धतीनंच या कारवाया सुरू आहेत, असं म्हणत अरविंद सावंत यांनी एनसीबीवर टीकास्त्र सोडलं आहे.

महाराष्ट्राला बॉलिवूडला बदनाम करायचे असे प्रकार सुरू आहेत. यातून महाराष्ट्राच्या अर्थकारणावर परिणाम होत असल्याचा आरोप शिवसेना प्रवक्ते, खासदार अरविंद सावंत यांनी केला.

दरम्यान, राष्ट्रवादीसह शिवसेनेचाही आर्यन खानला पाठिंबा असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आता या आरोप-प्रत्यारोपांच्या खेळीत पुढे काय होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

अविनाश भोसले यांच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडून गुन्हा दाखल

मुंबई ड्रग्स प्रकरणी नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

“NCB अधिकारी समीर वानखेडेंचे कॉल डिटेल्स तपासा, भाजप नेत्यांचे कॉल दिसतील”

‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे आजचा भाव

पुढील 4,5 दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More