नितीन गडकरींच्या घोषणेनंतर पुण्यातील ‘हे’ दोन टोलनाके बंद होणार
पुणे | केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या काही वर्षात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विरोधक देखील त्यांच्या कामाचं कौतूक करतात. आता गडकरींनी टोल नाक्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. याचा फायदा पुण्याला होणार आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवडे, पुणे-नाशिक महामार्गावरील शिंदे टोलनाका बंद होणार आहेत. परिणामी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुणे महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या दोन महामार्गांचा यामध्ये समावेश होणार आहे.
राष्ट्रीय महामार्गांबाबत नितीन गडकरींनी संसदेला उत्तर देताना टोलनाक्यांसंदर्भात विस्तृत योजना सांगितली होती. या योजनेबद्दल सर्वपक्षीय खासदारांनी गडकरींचं कौतूक केलं आहे. आता प्रत्यक्षात कधीपासून योजनेचा अंमल होतो हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांचा प्रश्न सुटला पण राज्य महामार्गांवरील टोलनाक्यांबाबत ठाकरे सरकारच्या निर्णयाची सर्वजण प्रतिक्षा करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत शरद पवारांची भेट घेणार”
विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा पेनड्राईव्ह बॉम्ब, म्हणाले…
“तेच मूर्ख, तेच शहाणे सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते”
‘ये डर होना जरूरी है’, चंद्रकांत पाटलांचा आव्हाडांना खोचक टोला
“मुंबईचा विचार फक्त सोन्याची अंडे देणारी कोंबडी म्हणून केला गेला”
Comments are closed.