बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ भारतीय कंपनीची इलेक्ट्रीक बाईक बाजारात दाखल; किंमत पेट्रोल बाईकपेक्षा कमी

नवी दिल्ली | पर्यावरणाला प्रदूषणाचा वाढता धोका लक्षात घेऊन इलेक्ट्रीक वाहन धोरण भारतात लागू झालं आहे. देशातील प्रदूषणाची आकडेवारी वाढत आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या महत्वाकांक्षी इलेक्ट्रीक वाहन धोरणाला गती दिली आहे. भारतीय बाजारात ओला इलेक्ट्रीक मोटारसायकल घेऊन आली होती.

आता भारतीय बाजारात डिटेल या कंपनीनं इलेक्ट्रीक स्कुटर लाॅंच केली आहे. या बाईकची किंमत ही पेट्रोलवर चालणाऱ्या बाईकपेक्षा कमी आहे. अनेक फिचर घेऊन डिटेल भारतीय बाजारात उतरत आहे. ही गाडी अगदी कमी पैसे भरून कोणताही ग्राहक 1999 रुपयांत डिटेल ईव्ही इझी प्लस बाइक बुक करू शकणार आहे.

डिटेलच्या ईव्ही इझी प्लस बाइकची किंमत 39,999  रूपये इतकी आहे. जीएसटी धरून ही गाडी 41,999 रूपयांना मिळणार आहे. गाडीच्या बुकींगला सुरूवात झाली आहे. डिटेल इंडियाच्या साईटवर जाऊन ग्राहकांना या गाडीसाठी बुकींग करता येणार आहे. गाडीच्या बुकींगनंतर गाडी घेतेवेळी 40,000 हजार ही उर्वरीत रक्कम भरून गाडी ग्राहकांना भेटणार आहे.

इलेक्ट्रीक वाहन नियमांच पालन करून ही गाडी बनवण्यात आली आहे. ईव्ही इझी प्लस सिल्व्हर ग्रे आणि मेटॅलिक रेड या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. ईव्ही इझी प्लस सिंगल चार्जिंगमध्ये 60 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकेल. हे वैशिष्ट्यं असल्यानं गाडीच्या मागणीत वाढ होताना पहायला मिळत आहे.

 थोडक्यात बातम्या 

पोस्टाची बंपर योजना, आज पैसे गुंतवा 10 वर्षात 16 लाख मिळवा!

‘या’ योजनेतून मुलीच्या नावानं गुंतवणूक करा, मुदत संपताच मिळतील 65 लाख रूपये

फडणवीस सरकारच्या काळातील घोटाळे महाविकास आघाडी बाहेर काढणार!

दिल्ली ते अमेरिका, कित्येक तासांचा प्रवास, मोदींचं ‘वर्क फ्रॉम प्लेन’ पाहिलं का?

‘कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार इतके हजार रुपये’; केंद्राचं सर्वोच्च न्यायालात उत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More