बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेच्या माजी आमदाराचं बंड; पंढरपूरनंतर आता देगलूरही महाविकास आघाडीच्या हातातून जाणार का?

नांदेड | नुकत्याच झालेल्या पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीचा दारूण पराभव केला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. यातच आता महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं नुकतच कोरोनाने निधन झालं होतं. त्यानंतर आता नांदेडच्या देगलूर विधानसभाच्या जागेसाठी सत्ता संघर्ष होण्याची शक्यता आहे.

रावसाहेब अंतापूरकर हे देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. 10 एप्रिलला त्यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. त्यामुळे आता त्या जागेवर आता लवकरच पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. सध्या ही जागा काँग्रेसच्या खात्यात आहे. पण त्याआधी या जागेवर 2 वेळा आमदार राहिलेल्या शिवसेनेच्या सुभाष भोसले यांनी आता या जागेसाठी दंड थोपटले आहेत.

पोटनिवडणूक लागण्याची शक्यता असल्यानं काँग्रेसने या जागेसाठी तयारी करण्यास सुरूवात केली आहे. दिवंगत रावसाहेब अंतापूरकर यांच्यानंतर काँग्रेस त्यांच्या मुलाला निवडणुकीत उभा करण्याची शक्यता आहे. परंतू आता रावसाहेब अंतापूरकर यांच्याकडून हारलेल्या शिवसेनेच्या सुभाष भोसले यांनी बंड करत भाजपमध्ये जाण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, ही पोटनिवडणुक लढण्याची माझी इच्छा आहे. पालघर प्रमाणे शिवसेनेने ही जागा काँग्रेसकडून घ्यावी. पंढरपूरची पुनरावृत्ती देगलूरमध्ये होऊ देऊ नये, असा थेट इशारा सुभाष भोसले यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

पुण्यातील हत्येचं सत्र सुरूच; साताऱ्यातील पोलीस अधिकाऱ्याच्या आईची पुण्यात हत्या

‘त्या’ पत्रावरून आचार्य तुषार भोसले यांची शरद पवारांवर बोचरी टीका, म्हणाले…

मराठा उमेदवारांना तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्या- खासदार संभाजीराजे

नवविवाहीत नवरीने केलेल्या ‘या’ कृत्याने नवराच नाही तर संपूर्ण सासरवाडीला हादरवून सोडलं!

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू; ‘हा’ महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More