बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पवार-मोदी भेटीनंतर संजय राऊतांचा भाजपला इशारा, म्हणाले…

नवी दिल्ली | मोदी आणि पवार यांच्या भेटीत आश्चर्यकारक असं काही नाही. पंतप्रधान मोदी यांनी पवारांसारख्या ज्येष्ठ खासदाराला भेटणं यात नवीन काही नाही. पवार साहेब हे सहकार क्षेत्रातील जाणकार आहेत. याच मुद्द्यांबाबत पवार आणि मोदी यांच्यात चर्चा झाल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मधल्या काळात रिझर्व्ह बँकेनं नागरी सहकारी बँकांवर लावलेले निर्बंध किती अडचणीचे ठरणार आहेत हे पवारांनी पंतप्रधान मोदींना सांगितल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. तसेच नवं सहकार खातं ज्यांच्याकडे आहे, अशा अमित शाह यांचीही भेट घ्यावी लागणार आहे, असं पवार म्हणाल्याचं राऊत यांनी सांगितलं.

पवार आणि मोदी भेटीनंतर काही वेळातच संजय राऊत पवारांच्या भेटीला गेले होते. तिथून ते एकाच गाडीतून उपराष्ट्रपतींच्या भेटीलाही गेले. यावेळी पवारांनी मोदी आणि त्यांच्यात झालेल्या चर्चेची माहिती दिली. तसंच सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील अडचणी मोदींसमोर मांडल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, हा महाराष्ट्र आहे. इथं दबाव आणून काही होत नाही. हे काही 30 आमदारांचं राज्य नाही. जिथे कुठले विचार नाहीत. दबावातून सत्तांतर होतं. पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात दबावातून सत्ताबदल होऊ शकत नाही, अशा शब्दात राऊत यांनी भाजपला एकप्रकारे इशाराच दिला आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये आल्या तर…’; ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याची खुली ऑफर

“शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन करु, म्हणणाऱ्या अण्णांची फडणवीसांच्या भेटीनंतर भूमिका बदलली”

अनिल देशमुखांच्या मालमत्ता जप्तीनंतर काँग्रेसचे थेट ‘ईडी’ला प्रश्न

‘कुणी चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करायचं तर कुणी कमरेवर हात ठेवायचं’; भारतीचा धक्कादायक खुलासा!

महाराष्ट्रात आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, पण धोका अद्याप टळलेला नाही! 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More