बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर बांगलादेशमधील वातावरण खवळलं

ढाका | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच बांगलादेशच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त ढाका येथे आयोजित कार्यक्रमात गेले होते. त्याचवेळी मोदींच्या दौऱ्याविरोधात बांगलादेशच्या इस्लामी संघटनांनी कडाडून निषेध व्यक्त केला. मोदींच्या दौऱ्याविरोधात बांगलादेशच्या ब्राह्मणबरिया येथे आंदोलकांनी निदर्शनं केली.

बांगलादेशमधील हिंसाचारात आत्तापर्यंत 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच शासकीय कार्यालय आणि मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान आंदोलकांनी केल्याचं पाहायला मिळत आहे. बांगलादेशचे गृहमंत्री असदुज्जमां खान यांनी या प्रकरणात आता गंभीर दाखल घेऊन कडक कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

गेल्या 2 ते 3 दिवसांपासून काही समाज कटकांनी धार्मिक तेढ निर्माण करून देशाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं असून त्या दृष्टीने आम्ही कठोर कारवाई करणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे.

इस्लाम संघटना हिफाजत-ए-इस्लाम या संघटनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्यादरम्यान त्यांचा निषेध व्यक्त केला. आता या सर्व प्रकरणात काही उपद्रवी लोकांनी पोेलिसांवर तसेच पोलिस स्टेशनवरही हल्ला केला, त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. हे आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी सरकारतर्फे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

थोडक्यात बातम्या

“दुकानं बंद करण्यास अजून एक तास वाढवून देण्यात यावा”

रितेश आणि त्याच्या परिवाराकडून दिलेल्या होळीच्या शुभेच्छांचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

‘…म्हणुन एवढे वर्ष मिठी नदी साफ केली नाही’; वाझे प्रकरणात भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल

अमित शहा-शरद पवारांच्या कथित भेटीवर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

‘ही’ प्रसिद्ध मराठी गायिका धरणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More