तंत्रज्ञान देश

PUBG ला आता FAU-G चा पर्याय; अक्षय कुमारने केली घोषणा

नवी दिल्ली | काही दिवसांपूर्वीच देशात पब्जी गेमवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर लगेच FAU-G या भारतीय गेमचा टीझर आला आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने ट्विट करून या गेमचा फोटोही त्यात जोडला आहे.

अक्षयने ट्विटमध्ये लिहिलंय,”पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला समर्थन देऊन तुमच्यासमोर Fearless And United-Guards (FAU-G) या अ‌ॅक्शन गेमबद्दल सांगायला अभिमान वाटतोय.”

पुढे बोलताना म्हणाला,”मनोरंजनाच्या व्यतिरिक्त खेळाडूंना आपल्या सैनिकांच्या त्यागाची भावना लक्षात येईल. यातून मिळणारे २०% पैसा सैनिकांना ‘भारत के वीर’ द्वारे देणगी म्हणून देणार आहे.”

FAU-G गेम बंगळुरूच्या nCORE कंपनीने बनवली आहे. सध्या या गेमबद्दल काही माहिती दिलेली नाही, पण ही गेम पब्जीप्रमाणेच आहे. देशाची राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेता सरकारने पब्जीसह ११८ चीनी अ‌ॅपवर बंदी घातली आहे.

महत्वाच्या बातम्या-

ना भूले है, ना भूलने देंगे, भाजपने छापले सुशांतचे स्टिकर्स

पत्रकारांना 50 लाखांचं विमा कवच देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेणार- राजेश टोपे

सुशांत आत्महत्याप्रकरणी नोकर दिपेश सावंतला अटक

राज्यात कोरोनाचा कहर सुरूच; पाहा गेल्या 24 तासातील धक्कादायक आकडेवारी

महाराष्ट्रासाठी पुढचे तीन महिने आव्हानात्मक आहेत- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या