बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुल-दिशाच्या लग्नानंतर आता राखी म्हणतेय, ‘पुढच्या वर्षी माझ्या लग्नाला यायचं’

मुंबई | बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत आपल्या वादग्रस्त आणि चित्रविचित्र विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतात. सध्या राहुल आणि दिशाला शुभेच्छा देणाऱ्या व्हिडीओमुळे राखी चर्चेचा विषय ठरत आहे.

राहुल आणि दिशाच्या विवाह सोहळ्याला मनोरंजनसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांनी हजेरी लावली होती. परंतु यापैकी राखी सावंतने मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. राखीनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राखीनं गाणं गायलं आहे, राहुलकी बारात, दिशा के रंगीले होंगे हाथ, मगन राखी नाचेगी.

पुढे राखीनं म्हटलं की, ‘राहुल लग्नासाठी अभिनंदन, मी दिशासाठी हा सुंदर गळ्यातील सेट घेतला आहे. पुढच्या वर्षी तुम्ही सर्व माझ्या लग्नाला या. एकीकडे राखी म्हणते माझं लग्न झालं आहे तर दुसरीकडे म्हणते माझ्या लग्नाला या, त्यामुळे तिचे चाहते पुन्हा गोंधळात पडले आहेत.

दरम्यान, राखीचं नुकतच ‘मेरे ड्रीम में तेरी एंट्री’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला भरभरुन प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला. राखीच्या जबरदस्त डान्स मूव्हजनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

थोडक्यात बातम्या – 

पुढचे 5 दिवस महाराष्ट्रातील काही भागांना रेड तर काही भागांना ऑरेंज अलर्ट; वाचा सविस्तर

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल

मुसळधार पावसाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली तातडीची बैठक

“हाच लबाड कोल्हा शिवसेनेतून मोठा झाला अन् आता शिवसेनेवरच बोलतोय”

दरडींवर गेल्या 10 वर्षांपासून उपाययोजनाच नाही; नगरविकास विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More