बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज कुंद्रानंतर आता आणखी एका कंपनीची होणार चौकशी, बजावला समन्स

मुंबई | अश्लील व्हिडीओ प्रकरणात सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे राज कुंद्रा. याप्रकरणात पोलिसांकडे राज कुंद्राच्या विरोधात पुरावे असल्यानं त्यांनी राजला अटक केली. कुंद्रा यांना अटक केल्यानंतर राजनं आपले वकील अबद पोंडा यांच्या माध्यमातून कोर्टात धाव घेतली. त्याच्या वकिलांनी अटकेबाबत मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश रद्द करण्याची मागणी केली होती. अशातच आता याप्रकरणी एक महत्वाची बातमी समोर येत आहे.

राज कुंद्रा प्रकरणात पोलीस चौकशीमधून आता आणखी एक नवी बातमी समोर आली आहे. आता गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलनं आर्म्सप्राइम मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक सौरभ कुशवाह यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. मुंबई पोलिसांनी आता या प्रायव्हेट लिमीटेड कंपनीच्या संचालकाला समन्स पाठवला आहे.

आता या प्रकरणात चौकशीमधून आणखी नवीन महत्वाची बातमी समोर येणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या प्रकरणी कुंद्राची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. मात्र तिचा या प्रकरणात काही सहभाग असल्याचं पोलिसांना आतापर्यंतच्या तपासात आढळलेलं नाही. मात्र अजून पोलिसांनी तिला क्लीन चिटही दिलेली नाही.

दरम्यान, 27 जुलैला राज कुंद्राला कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 11 जणांना अटक केली आहे. 

थोडक्यात बातम्या –

धक्कादायक! अन् पूराच्या पाण्यात चक्क ब्रिज वाहून गेला, पाहा व्हिडीओ

भारतीय कुस्तीपटूंचा निर्णायक डाव; दीपक पुनिया आणि रवी दहिया सेमीफायनलमध्ये दाखल

MPSCच्या उमेदवारांसाठी मोठी बातमी; अखेर परीक्षेची तारीख ठरली

करदात्यांना सरकारचा दिलासा; केली ‘ही’ घोषणा

अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी गहना वशिष्टला कोर्टाकडून आणखी एक झटका!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More