बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाच्या बहिणीची पोस्ट व्हायरल, म्हणाली…

मुंबई | बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ प्रकरणी अटक झाल्यापासून ते दोघेही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. अशातच आता शिल्पाची बहिण शमिता शेट्टीची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हयरल होताना दिसत आहे.

शमितानं सोशल मीडियावर स्वतःचा फोटो शेअर करत एक सकारात्मक असा संदेश लिहिला आहे. कधी कधी आपल्यात असलेली शक्ती ही कायम एखाद्या मोठ्या अग्नीच्या स्वरूपात कोणाला दिसत नाही, ती एखाद्या लहान ठिणगीच्या रूपात जिवंत असते. तू पुढे जात रहा. लोकांना आपल्याबद्दल काय वाटतं किंवा ते आपल्याविषयी काय विचार करतात यावर आपण नियंत्रण करू शकत नाही, असं शमितानं पोस्टमध्ये लिहिलं आहे.

सध्या ते ज्या काही वैयक्तिक समस्यांमधून जात आहेत आणि त्याच्याशी तुमचा काही संबंघ नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे आणि प्रेमाने तुम्ही तुमचं काम करत रहा, असंही शमितानं म्हटलं.

दरम्यान, शमिताची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या या पोस्टला काही नेटकऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे तर काहींनी मेहुण्यावरुन ट्रोल केलं आहे. शमितानं यापुर्वीही राज कुंद्रा प्रकरणानंतर एक पोस्ट शेअर केली होती. शिल्पाच्या या कठीण काळात तिची बहीण शमिता शेट्टीनं तिला प्रोत्साहन दिलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘काम हवं असेल तर निर्मात्यांना खूश करावं लागेल’; शरीरसुखाची मागणी करणाऱ्यांना मनसेचा चोप

“सत्ताधारी असो वा विरोधक, संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांचं दोन वर्षांसाठी निलंबन करा”

“मुली रात्रभर बीचवर फिरतात याची जबाबदारी पालक सरकार आणि पोलिसांवर टाकू शकत नाही”

दगडूशेठ गणपतीचा अनोखा उपक्रम, 5 लाख भाविकांनी घेतले दर्शन!

गारवा हॅाटेलच्या मालकाची हत्या, अत्यंत धक्कादायक खरी स्टोरी आली समोर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More