नवी दिल्ली | बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याने नुकतंच न्यूड फोटोशूट केलं आहे. त्यामुळे तो नुकताच चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. एका मॅगझीनसाठी त्याने हे विवस्त्र फोटोशूट केले आहे. यावर भाष्य करत त्याच्यावर अनेकांनी टीका केली आहे. कोणी याला विरोध दर्शवला आहे तर कोणी पाठींबा दिला आहे. यातच आता रणवीरचा हा ट्रेण्ड साऊथमध्ये फाॅलो करण्यात आला आहे.
रणवीरनंतर साऊथ सिनेमा स्टार विष्णूनेही न्यूड (Nude) फोटोशूट केलं आहे. त्यानं हे फोटोशूट त्यांच्या इंस्टाग्राम (Instagram) च्या अधिकृत अकाऊंटवर पोस्ट केलं आहे. त्यानं टाकलेल्या कॅप्शनवरुन त्यांच्या बायकोनेच त्याचं हे फोटोशूट केल्याचं समजत आहे. गोईंग विथ ट्रेण्ड असं त्याने लिहिलं आहे. त्यात त्याने जेव्हा खुद्द तुमची बायको तुमचे फोटोशूट करते असं लिहित त्याची बायको ज्वाला गुट्टाला देखील त्याने टॅग केलं आहे.
विष्णु हा सध्या साऊथमधील एक प्रसिद्ध अभिनेता (Actor) आहे. अभिनय क्षेत्रात उतरण्यापूर्वी तो एक खेळाडू होता. त्यांचे नाव यापूर्वी विशाल असे होते. त्याची पत्नी ज्वाला गुट्टा देखील एक खेळाडू आहे. ती बॅडमिंटनपटू आहे. तिने अनेक राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. सध्या ती एक बॅडमिंटन अकॅडमी चालवते. ज्वाला आणि विष्णू या दोघांचं हे दुसरं लग्न आहे.
दरम्यान, यापूर्वीही अनेक स्टार्सनी न्यूड फोटोशूट केलं आहे. ज्यामुळे तेही वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. प्रसिद्ध माॅडेल सोमण प्रभु याने चक्क सापासोबत (Snake) न्युड फोटोशूट केलं होतं. तर मराठीतील प्रसिद्ध काॅमेडी शोमधील वनिता खरात हिने देखील न्यूड फोटोशूट केलं होत. तिलाही ट्रोल करण्यात आलं होत.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईकरांसाठी सर्वात मोठी घोषणा!
‘घटना सर्वांसाठी सारखीच’, संजय राऊतांचा शिंदे सरकारला इशारा
काळजी घ्या! ‘या’ जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार
‘शिवसेनेच्या अश्रुत हे सरकार वाहून जाईल’, संजय राऊत शिंदे सरकारवर बरसले
‘शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं कारण…’, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
Comments are closed.