Top News सातारा

सातारच्या पाटलानं पटवली ‘कश्मीर की कली’; ‘हा’ अडथळा दूर होताच उडवला बार!

सातारा | जम्मू काश्मिरमधून कलम 370 हटवल्यामुळे सातारच्या एका तरूणाला चांगलाच फायदा झालाय. सातारमधील कराडचे अजित पाटील आता काश्मिरचे जावई झालेत.

अजित पाटील हे भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत. अजित यांनी काश्मिरमधील सुमन देवी हिच्यासोबत लग्न केलंय. या दोघांनीही प्रथन किस्तवाडमध्ये काश्मिरी पद्धतीने लग्न केलं आणि त्यानंतर कराडमध्ये महाराष्ट्रीच्या पद्धतीने सात फेरे घेतलेत.

साताऱ्याचे अजित आणि काश्मिरची सुमन यांचं लग्न होण्यासाठी कलम 370 चा मोठा अडथळा होता. मात्र हे कलम हटवण्यात आल्याने दोघांनी लग्नाचा बार उडवून दिलाय. 27 नोव्हेंबर रोजी दोघंही लग्नाच्या बंधनात अडकलेत.

जर सरकारने 370 कलम हटवलं नसतं तर आम्ही लग्न करु शकलो नसतो. त्यामुळे हे कलम हटवल्याचा अधिक फायदा मला झालाय, असं अजित पाटील यांनी सांगितलंय.

थोडक्यात बातम्या-

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर बलात्काराचा आरोप

शिवसेनेसारखी कामं आपल्याला करायची नाहीत- चंद्रकांत पाटील

महाविकासआघाडीतील अंतर्गत पक्षांतरावर छगन भुजबळ म्हणाले…

लवकरच भाजपला मोठी गळती, भाजपचे काही आमदार राष्ट्रावादीच्या वाटेवर- नवाब मलिक

“… तर 1000 कोटी रुपये खर्चून नवीन संसद भवनाचा थाट कशासाठी”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या