बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊतांनंतर आता काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता अडचणीत

मुंबई | काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांनी माजी मंत्री आणि काॅंग्रेसचे आमदार अस्लम शेख(Aslam sheikh) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शेख यांनी कोरोना काळात मलाड पश्चिमेकडील मढच्या समुद्रात बांधकामास मदत केली. त्यांनी मढ परिसरात तब्बल 28 फिल्म स्टुडिओचे कमर्शियल बांधकाम सुरू केले आहे. त्यातील  पाच स्टुडिओ हे सीआरझेड झोनमध्ये येत आहे. तसेच यात 1000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

आता आमदार अस्लम शेख यांना राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने (Environment Department)मढ- मार्वे स्टुडिओ प्रकरणी नोटीस जारी केली आहे. या प्रकरणी मुंबई महानगरपालिका आणि जिल्हा अधिकारी यांनी कठोर कारवाई करावी, असे आदेश या नोटीसद्वारे करण्यात आले आहेत. त्यामुळे अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विट मध्ये त्यांनी म्हटलं आहे की, अस्लम शेख- मढ मार्वे 1000 कोटी रूपयांचा स्टुडिओ घोटाळा आहे. महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने नोटीस जारी केली आहे. त्यात मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. तसेच स्टुडिओ तोडण्याच्या कारवाईची अपेक्षा आहे, असंही सोमय्या ट्विटमध्ये स्पष्ट म्हणले आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर अस्लम शेख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीला अस्लम शेख यांच्यासोबत भाजप नेते मोहित कंबोज देखील होते. ते दोघे भेटीसाठी एकाच गाडीत गेले होते, त्यामुळे राजकारणात अनेक चर्चा रंगल्या आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

आयसीआयसीआय आणि पीएनबी बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका!

दीपक केसरकर यांचा मोठा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ

‘मामी म्हणलेलं मला आवडतं, फार मजा येते’ -अमृता फडणवीस

मोठी बातमी! सामनाच्या संपादकपदी पुन्हा उद्धव ठाकरे

राष्ट्रवादी काॅंग्रेसला आणखी एक धक्का; अजित पवारांना राजीनामा द्यावा लागणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More