बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इम्तियाज जलील यांचा जल्लोष पाहिल्यानंतर, अमेय खोपकर म्हणतात…

औरंगाबाद | औरंगाबाद शहरात कोरोना पसरण्याला ‘एमआयएम’ खासदार इम्तियाज जलील जबाबदार आहेत. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करुन काल इम्तियाज जलील यांनी जल्लोष साजरा केला होता. अशा शब्दात शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आगपाखड केली. त्यानंतर खैरेंनी जलील यांच्या अटकेची मागणी केली आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही जलील यांच्यावर सडकून टीका केली आहे.

‘एमआयएम’ च्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का? संभाजीनगरमघ्ये लॉकडाऊन स्थगित झाला म्हणून इम्तियाज जलील आणि त्यांच्या पक्षाने मोठा जल्लोष केला. संभाजीनगरमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. परिस्थिती गंभीर असताना जल्लोष करुन नाचताना शरम वाटायला पाहिजे, असं अमेय खोपकरांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. हे असे ‘व्हायरस’ वेळीच ठेचायला हवेत. कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या असल्या स्टंटबाज नेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही अमेय खोपकर यांनी केली आहे.

दरम्यान, औरंगाबादमधील लॉकडाऊनचा निर्णय रद्द होताच इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी इम्तियाज जलील यांच्या ऑफिससमोर मोठी गर्दी करत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूक सुद्धा काढली होती. इम्तियाज जलील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना कोरोनाचा विसर पडला होता.

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात 80 टक्के कोरोनाबाधितांना लक्षणंच नाही

सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यावर केला ‘हा’ गंभीर आरोप

1 एप्रिलपासून ‘या’ वयोगटापुढील व्यक्तींना मिळणार कोरोना लस, असा लावा नंबर!

“…तर सचिन तेंडूलकर, लक्ष्मण आणि गांगूली कधीच पास झाले नसते”

मनसेच्या ‘या’ बड्या नेत्याला पोलिसांनी केली अटक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More