बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सेक्सनंतर प्रेयसीने केली विचित्र मागणी, वैतागलेल्या प्रियकराने थेट तज्ञांकडे मागितली मदत

नवी दिल्ली | तरुण-तरुणींच्या प्रेमसंबंधांमध्ये अनेकदा प्रेयसी तिच्या बाॅयफ्रेंडकडे विचित्र मागण्या करत असते. अशा प्रकारेच एका तरुणाकडे त्याच्या प्रेयसीने केलेल्या मागणीनंतर तो गडबडून गेला आहे. एवढंच नाही तर तिच्या मागणीने तो एवढा वैतागला आहे की त्याने थेट रिलेशनशीप पोर्टल ‘एक्स्पर्ट’वर सहकार्याची मागणी केली आहे.

संबंधित घटनेमधील दोघेही मागील 3 वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असून प्रेयसीची वागणूक चांगली आणि ती हुशार असल्याचं प्रियकराने म्हटलं आहे. मात्र तिची एक सवय आमच्यातील वादाचे कारण होत असल्याचं प्रियकराने सांगितलं. प्रेयसीच्या सर्व सवयी चांगल्या असून तिला कौतुकासोबत टीका ऐकण्याची वाईट सवय असल्याचं प्रियकराने म्हटलं आहे. जेवण केल्यानंतर, गिफ्ट दिल्यानंतर एवढंच नाही तर सेक्स केल्यानंतरही तिला कौतुकासोबत टीका ऐकायला आवडत असल्याचं तरुणाने सांगितलं आहे.

जेवण चांगलं झाले आहे मात्र, बटाट्याच्या भाजीला चव नव्हती नाहीतर तू आज चांगलेच कपडे घातले आहेत मात्र या रंगाची ओढणी त्यावर चांगली दिसत नाही, अशा प्रकारे तरुणाला त्याच्या प्रेयसीची स्तूती तसेच टीका देखील करावी लागते असं त्यानं म्हटलं आहे. एवढंच नाही तर सेक्सनंतर सुद्धा तिचं कौतुक आणि टीका करावी लागत असल्याचं तरुणाने सांगितलं आहे.

दरम्यान, प्रेयसीच्या या अजब सवयीमुळे प्रियकराने अशा गोष्टींची एक यादी तयार केली आहे ज्यामध्ये कौतुकासोबत त्याने टीका देखील लिहिली आहे. प्रेयसिला एखादा मानसिक आजार असावा असे समजून प्रियकराने तिला थेरेपिस्टकडे जाण्याचा देखील सल्ला दिला आहे

थोडक्यात बातम्या-

शरद पवारांच्या सातारच्या सभेची पुनरावृत्ती, फक्त यावेळी पावसात भिजले जयंत पाटील!

तृतीयपंथियांमध्ये खुनी खेळ, 55 लाखांची सुपारी देऊन दुसऱ्या गँगच्या म्होरक्याला मारलं!

राजेश टोपेंनी सांगितले टास्क फोर्सच्या बैठकीतील महत्वाचे मुद्दे; वाचा एका क्लिकवर

वृद्धाची हत्या करुन गावाबाहेर नेऊन पुरलं, मात्र कुत्र्यांनी…

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रूग्ण!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More