महाराष्ट्र मुंबई

शरद पवारांच्या कडवट टीकेवर पार्थ पवार यांची अतिशय सायलेंट प्रतिक्रिया…!

मुंबई |  पार्थ पवार इममॅच्युअर आहेत. त्यांच्या मताला आम्ही कवडीची किंमत देत नाही, अशी कडवट टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. यानंतर शरद पवार यांच्या वक्तव्यावर पार्थ पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (After Sharad Pawar Criticism Parth Pawar Firts Reaction)

एबीपी माझा आणि टीव्ही 9 मराठी या दोन्ही वृत्तवाहिन्यांनी पार्थ पवार यांना पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता, मला आताच या प्रकरणावर काहीही बोलायचं नाही, अशी एका ओळीतली प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली. (After Sharad Pawar Criticism Parth Pawar Firts Reaction)

सुशांस सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. ही मागणी अशा वेळी केली होती ज्यावेळी महाविकास आघाडीमधला प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने सुशांत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडेच रहावा असा आग्रह धरला होता. पार्थ पवार यांच्या मागणीमुळे शिवसेना नाराज झाली होती.  (After Sharad Pawar Criticism Parth Pawar Firts Reaction)

दुसरीकडे पार्थ पवार यांनी राम मंदिर भूमीपूजनावर देखील सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. श्रद्धा आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेले श्री राम अखेरीस शांतपणे आपल्या घरी येतील. हा लढा कडवट आणि प्रदीर्घ होता. अखेरीस एक पूर्ण पिढी एका ऐतिहासिक दिवसापशी येऊन ठेपली आहे, असं ते म्हणाले होते. त्यांची ही प्रतिक्रिया थेट पवारांच्या मतांच्या विसंगत होती. तर पार्थ यांचं म्हणणं हे व्यक्तिगत आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली होती. (After Sharad Pawar Criticism Parth Pawar Firts Reaction)

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात दीड हजारांहून जास्त रुग्ण आढळले!

काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना कोरोनाची लागण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या