बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना झालेल्या महिलेच्या हृदयातून काढली चक्क 7 सेंटीमीटरची गाठ

मिरारोड | देशात कोरोनानं हाहाकार माजवला आहे. अनेक कोरोना रूग्णांचे मृत्यू होत आहेत. अशातच एका महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला. कोरोनासोबतच तिला हृदयासंबंधी विकारही होता. या महिलेच्या हृदयातून चक्क 7 सेंटिमीटरची गाठ काढण्यात मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांना यश मिळालं असल्याची घटना समोर येत आहे.

कोल्हापूर येथील 28 वर्षीय योगिता पाटील हिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानं तिला रुग्णालयात दाखल केलं. वैद्यकीय चाचणीत तीला कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं. औषधोपचारानंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं तिला तातडीनं मीरा रोड येथील सदर खासगी रूग्णालयात हलवलं. डाॅ. अनुप टकसांडे यांनी या महिलेची इकोकार्डिओग्राफी तपासणी केली. या चाचणीत महिलेच्या हृदयाच्या उजव्या वरच्या भागात 7 सेंटिमीटर इतक्या मोठ्या आकाराची गाठ असल्याचं समोर आलं.

कोरोना संसर्ग असल्यानं या महिलेवर स्टिरॉइड्स आणि रेमडेसिवीरद्वारे उपचार करण्यात आले आणि जेव्हा कोरेना संसर्ग बरा झाला त्यानंतर दहा दिवसांनी तिच्या हृदयावर शस्त्रक्रिया करून गाठ काढण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर या महिलेवर पाच दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं.

दरम्यान, सहा तास ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया चालली. कोरोना संसर्गामुळे या महिलेला दम्याचा त्रास जाणवत होता. त्यातच हृदयात असलेली ही इतकी मोठी गाठ काढणं हे डॉक्टरांसाठी एक मोठे आव्हानच होतं.

थोडक्यात बातम्या – 

“मराठा समाजाला आरक्षण देऊन अशोक चव्हाण यांचा राजीनामा 5 जुलैपर्यंत घ्या, नाहीतर…”

खुशखबर! ‘हा’ अपवाद वगळता प्रवासासाठी आता ई-पासची गरज नाही

‘लस घ्या आणि मिळवा मोफत बिर्याणी’; ‘या’ ठिकाणी राबवली जातेय अनोखी योजना

“मोदीजी आम्ही देशासाठी बलिदान देण्यास तयार आहोत” पाहा चिमुरड्यांच्या हा व्हिडीओ

‘नियमांचं तातडीनं पालन करा अन्यथा…,’; केंद्र सरकारचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More