बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तासाभरात होत्याचं नव्हतं झालं; रिमोटची बॅटरी गिळल्याने अवघ्या 2 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

नवी दिल्ली | लहान मुलं खेळताना काहीही उचलतात आणि तोंडात घालतात. यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं मुलांच्या जिवावार बेतू शकतं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खेळताना रिमोटची बॅटरी गिळाल्यामुळे अवघ्या 2 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

संबंधित चिमुकलीचं नाव हार्पर असं आहे. एका मुलाखतीवेळी हार्पच्या आईने आपल्या मुलीची पाहिलेली अवस्था पाहिली असून ती अवस्था कशी झाली होती हे ऐकल्यावर कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. यावेळी हार्पर तिच्या खोलीत एकटीच होती, जेव्हा तिच्यासोबत ही घटना घडली. तिनं काहीतरी गिळलं आणि त्यानंतर तिचं डोकं अचानक मागच्या दिशेनं जाऊ लागलं तसेच तिच्या तोंडातून रक्त येऊ लागलं. ती काहीच बोलू शकत नव्हती, तिचे डोळे बंद झाले, असं हार्परच्या आईने सांगितलं आहे.

हार्परची अवस्था पाहून तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. बॅटरीमुळे हार्परची अन्ननलिका पेटली होती, त्याला होल पडले होते. तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र सर्जरी करतानाच हार्परचा मृत्यू झाला. यानंतर डाॅक्टरांनी कदाचित तिच्या मुलीने बॅटरी गिळली असावी असं सांगितलं.

दरम्यान, आईने घरी जाऊन पाहिलं तर रिमोट कंट्रोलमधील बॅटरी गायब होती. हार्परने टॉफी समजून रिमोट कंट्रोलची बॅटरी गिळली होती. एका खेळण्यामुळेही मुलीचा जीव जाऊ शकतो, असं कधी वाटलं नव्हतं, असं हार्पची आई स्टेसी म्हणाली आहे. तसेच आपल्या लेकीसोबत जे झालं ते कोणासोबत न व्हाव म्हणून हार्पचे पालक इतर पालकांना जागृक करत मुलांना रिमोट आणि बॅटरी असलेल्या खेळण्यांपासून दूर ठेवा, असं आवाहन केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

अँटीबाॅडी तयार न झाल्यानं अदर पुनावाला यांच्यासह 7 जणांविरोधात न्यायालयात अर्ज

“काँग्रेसमध्ये आधी माझ्या शब्दाला किंमत होती, आता काँग्रेसमधली विचारांची परंपरा संपत चाललीये”

सावधान! कोरोना रुग्णांमध्ये आढळलं ‘हे’ नवीन गंभीर लक्षण

‘ही’ लस कोरोनाच्या सर्व व्हेरिअंटवर प्रभावी; अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेचा दावा

“ज्या पवारांनी त्यांची जात काढली, त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून राजू शेट्टींना अश्रू ढाळावे लागतायत”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More