बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर चोविस तासातच महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला. शिवसेनेतच राहुन एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली.

गुरुवारी 30 जून रोजी नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी झाला. त्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शप्पथ घेतली.

शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत दोनही नव्या मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगलं काम होवो, ही सदिच्छा.

एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेचे 39 बंडखोर आमदार आणि अपक्ष 9 असा 48 आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन करण्यात आलं. भाजपने शिंदे यांना पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन करण्यात आलं आहे. विधान परीषद निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सुरु झालेले सत्तानाट्य काल नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर संपलं.

थोडक्यात बातम्या – 

‘एकनाथ शिंदेजी अभिनंदन, पण…’; शुभेच्छा देत राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा

एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

‘मी एकनाथ संभाजी शिंदे, शपथ घेतो की….’; एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

“सत्ता समोर आल्यानंतर मोह सोडायला संघाचे संस्कार आणि देवेंद्र फडणवीसांचे काळीज लागतं”

फडणवीसांची मोठी खेळी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सरकारचं रिमोट देवेंद्र फडणवीसांकडे?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More