बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के! ठाण्यानंतर आता नवी मुंबईतील नगरसेवक शिंदे गटात जाणार?

मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीपासून शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेना आमदारांचा मोठा गट फुटला असून आता शिवसेनेचे नगरसेवक देखील शिंदे गटात सामील होत आहेत.

शिवसेनेचे 40 आमदार फुटल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर शिवसेनेतील गळती कायम असून ठाणे महानगरपालिकेतील 66 नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहे. ठाण्यानंतर आता नवी मुंबईत देखील शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई महापालिकेतील 30 ते 32 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. तर आगामी काळात हे नगरसेवक शिंदे गटात सामील होण्याची देखील चर्चा आहे. नवी मुंबई महापालिकेत शिवसेनेचे 50 नगरसेवक आहेत. त्यातील 30-32 नगरसेवक शिंदे गटात गेले तर ठाणे महानगरपालिके पाठोपाठ नवी मुंबई महापालिकेतही शिवसेनेला झटका बसू शकतो.

दरम्यान, 40 आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे 66 नगरसेवक शिंदे गटात गेले. तर शिवसेनेचे 12 खासदार देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आगामी काळात हे खासदार शिंदे गटात जाणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

बसा बसा म्हणत फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवलं, पाहा व्हिडीओ

नासक्या भाजीची उपमा देत गुलाबराव पाटील संजय राऊतांवर बरसले, म्हणाले…

महागाईने त्रस्त सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी!

“माझ्या सारख्या नेत्याला कधीच वाटणार नाही की शिवसेना संपायला हवी”

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा झटका!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More