बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अपघातानंतर विनायक मेटेंचा शेवटचा फोटो आला समोर

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठा आरक्षणासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी विनायक मेटे हे रात्रीच रवाना झाले होते. आज बीडमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. सर्व कार्यक्रम रद्द करून विनायक मेटे हे मुंबईला रवाना झाले होते. विनायक मेटे हे आपल्या कार्यकर्त्यांसह रात्री बीडहून मुंबईला रवाना झाले होते. मुंबईला जात असताना विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला

भीषण अपघातात विनायक मेटे यांच्या झालेल्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला आहे. ते 52 वर्षांचे होते. या अपघाताआधीचा मृत्यूपूर्वीचा विनायक मेटे (Vinayak Mete ) यांचा अखेरचा फोटो समोर आला आहे.

विनायक मेटे यांचा रक्तबंबाळ झालेला चेहरा दिसून आलाय. त्यांना एका स्ट्रेचरवर झोपवण्यात आलं होतं. त्यांना शुद्ध नव्हती. पिवळ्या रंगाचा एक शर्ट विनायक मेटे यांनी घातलेला होता. त्याच्या शर्टाच्या खिशाला भारताचा झेंडा तिरंगाही होता.

 

 

थोडक्यात बातम्या- 

“ते तासभर गाडीतच पडून होते, मी रस्त्यावर झोपलो वाहनांना हात केला पण…”

शेवटच्या एका तासात होत्याचं नव्हतं झालं; मेटेंच्या ड्रायव्हरने सांगितली धक्कादायक माहिती

Vinayak Mete | विनायक मेटे यांचं कार अपघातात निधन

मोठी बातमी! शिंदे गटातल्या ‘इतक्या’ खासदारांना लॉटरी लागणार

न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलरचा अत्यंत धक्कादायक खुलासा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More