बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुमचा भुजबळ करू म्हणणाऱ्यांना…’;निर्दोष मुक्ततेनंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली मुंबई सत्र न्यायालयाने छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्ता करण्यात आली. त्यानंतर आता महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळ मुक्त झाले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सत्य परेेशान हो सकता है, लेकीन पराजित नहीं, असं म्हणत छगन भुजबळ यांनी त्यांची न्यायालयाच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या मनात कोणत्याही व्यक्तीबद्दल द्वेष नाही. कोणाविषयी लोभ नाही. आमच्यावर खोटे आरोप करण्यात आले. मला विनाकारण तुरूंगवास भोगावा लागला, असं भुजबळ म्हणाले. छगन भुजबळ यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला.

साजिशे लाखों बनती हैं, मेरी हस्ती मिटानें के लिये, ये जनता कि दुवाए है, उन्हे मुक्कमल नहीं होने देती, असं म्हणत छगन भुजबळांनी आपल्या खास शैलीत शेरोशायरी म्हणताना दिसले. तुमच्या सर्व आशीर्वादामुळेच आम्ही या सर्व कटकारस्थानातून दोषमुक्त होत आहोत. यावेळी छगन भुजबळ यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वास दाखवल्याबद्दल आभार मानले आहेत. तुमचा भुजबळ करू म्हणणाऱ्यांना न्यायालयानं उत्तर दिलं असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, न्यायालयाच्या निकालानंतर तात्काळ शरद पवारांना सांगणं अपेक्षित होतं, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील मंत्रीमंडळाचे प्रमुख आहेत. त्यांनीही आज आनंद व्यक्त केला. आज मिळालेला न्याय ही समाधानाची बाब आहे. काही लोक मला झोपू देणार नाहीत, कोणी कितीही प्रयत्न केले तरी मी शांत झोपणार आहे, असं भुजबळ म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या –

पेट्रोल पंपावर आमदाराची फसवणूक, डिझेल भरल्यावर काही अंतरावरच बंद पडली गाडी

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील कीर्तनकारांना महिन्याला मिळणार ‘इतके’ हजार रूपये

चीनची तालिबानला मोठी आर्थिक मदत; मदतीच्या रकमेचा आकडा वाचून थक्क व्हाल

सिद्धार्थ सोबतच्या आठवणी सांगताना विद्युत जामवालला अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More