बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे कुटुंबावरील आरोपांनंतर संजय राऊतांची किरीट सोमय्यांना वॉर्निंग, म्हणाले…

मुंबई | अन्वय नाईक प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले होते. या आरोपांनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांचा चांगलाच कडक शब्दांत समाचार घेतला आहे.

संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, “खुलासा कोणी आणि का करावा हे शेठजींच्या पक्षाचे व्यापारी असणारे प्रवक्ते सांगणार नाहीत. आमच्या मराठी भगिनीचं कुंकू पुसलं गेलंय. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांचं कुटुंब न्यायासाठी आक्रोश करतंय मात्र त्यावेळी हे प्रवक्ते बोलण्यास तयार नाहीत.”

“आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तपास भरकटवण्यासाठी तसंच तपासाची दिशा बदलण्यासाठी हे प्रवक्ते फालतू मुद्दे घेऊन समोर येतायत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. कोण आहे हा माणूस? त्याच्यासाठी हातात कागद घेऊन गिधाडासारखा फडफडतोय,” अशा शब्दांत त्यांनी किरीट सोमय्या यांना फटकारलंय.

“मराठी माणसाने केलेला व्यवहार यांच्या डोळ्यात खुपतोय का? हा खोटारडेपणाचा कळस आहे. ही त्यांना वॉर्निंग असून त्यांनी अशी कितीही फडफड केली तरी हे सरकार पाच वर्ष चालणार आहे,” असंही संजय राऊत म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

अरविंद केजरीवाल वाद लावण्यात पटाईत; प्रमोद सावंत

मला मुख्यमंत्रिपदाचा मोह नाही- नितीश कुमार

..तर शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला नाही का?- प्रवीण दरेकर

“राजकारणात फादर आणि गॉडफादर लागतो, माझा गॉडफादर दिल्लीत”

“नारायण राणे दु:खी आत्मा, त्यांची अवस्था विक्रम-वेताळासारखी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More