बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

किंग खानचा मुलगा आर्यनच्या अटकेनंतर #SRK_का_बेटा_नशेडी हॅशटॅग होतोय ट्रेंड!

मुंबई | बॉलिवूडमध्ये किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरूख खान मोठ्या संकटात सापडला आहे. त्याचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने क्रुझवर ड्रग्स प्रकरणात ताब्यात घेतलं होतं त्यानंतर त्याची चौकशीही झाली अखेर त्याला आता एनसीबीने अटक केली आहे.

मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने छापा टाकत 12 लोकांना अटक केली होती. यामध्ये 9 पुरूष आणि 3 मुलींचा समावेश होता. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सापडल्यामुळे त्यांच्यावर मोठी टीका होत आहे. सोशल माध्यमांवर आर्यनला ट्रोल करण्यात येत आहे. ट्विटरवर एक हॅशटॅग ट्रेंडिंगला आला आहे, #SRK_का_बेटा_नशेडी असा आहे.

आर्यन खानसह अटक केलेल्या सर्वांना वैद्यकीय चाचणीसाठी मुंबईतील जे. जे. रूग्णालयात नेण्यात येणार असून त्यानंतर त्यांना न्यायालयात उभं केलं जाणार असल्याचं समजत आहे. आर्यनला तर ट्रोल केलं जात आहेच पण त्यासोबत शाहरूखलाही ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, आर्यन खानसोबतच अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा, नूपुर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा या सर्वांचीही एनसीबी चौकशी करत आहेत. क्रूझवर यांनी लपवून ड्रग्ज नेल्याची माहिती समोर आली होती.

 

 

 

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

ह्रदयद्रावक! केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांनी आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्यामुळे दोघांचा मृत्यू

राष्ट्रवादीने अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची संधी द्यायला हवी- चित्रा वाघ

‘शरद पवारांना पंतप्रधान व्हायचं असेल तर त्यांनी…’; सुधीर मुनगंटीवारांचा पवारांना सल्ला

शाहरूख खानचा मुलगा असू नाहीतर इतर कोणाचाही त्याला…- रामदास आठवले

‘मी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत…’; नवज्योत सिंग सिद्धूंचं मोठं वक्तव्य!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More