बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री आक्रमक, दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा (ST Employee Strike) तिढा सुटताना दिसत नाहीये. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) व एसटी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही काही निष्पन्न होत नसल्याने अखेर संतप्त कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर हल्ला केला.

शरद पवारांवरील या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आक्रमक झाले आहे. शरद पवारांच्या घरावर झालेला हा हल्ला निंदनीय असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. या हल्ल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पोलिस अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांवर आणि हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तर अशा हिंसेला प्रक्षोभ निर्माण करणाऱ्यांवर तसेच चिथावणी देणाऱ्यांवर कायद्याने कडक कारवाई झाली पाहिजे, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी गृहमंत्र्यांना दिल्या आहेत.

दरम्यान, नेत्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या घरांवर हल्ला करणे हा पायंडा महाराष्ट्राने कधीही पाहिला नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. तर या कर्मचाऱ्यांच्या संसाराच्या राखेवर कोणी आपल्या पोळ्या भाजू नयेत, असा इशारा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवार साहेब आता तरी संन्यास घ्या अन् गप्प घरी बसा”

‘सिल्वर ओक’ हल्ल्याप्रकरणी 107 जणांवर गुन्हा दाखल; गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात

सिल्वर ओकवरील घटनेनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“शरद पवारांचे वाईट दिवस सुरू झालेत”; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

“शरद पवारांनी 120 एसटी कर्मचाऱ्यांच्या बायकांचं कुंकू पुसलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More