मुलीच्या जन्मानंतर सरकारकडून मिळणार ‘इतके’ हजार

मुंबई | केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. तर राज्य सरकारने (Goverment) आता लेक लाडकी योजना नव्या स्वरूपात सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.

मुलीच्या जन्मानंतर 5 हजार (5 Thousand) रुपये तर पहिलीत गेल्यानंतर 4000 रुपये सहावीत गेल्यानंतर 6000 रुपये सरकारकडून दिले जाणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिलीये.

मुलगी 11 वीला गेल्यानंतर 8000 रुपये आणि 18 वर्षांची झाल्यावर 75000 रुपये मिळणार असल्याचं सांगितलं आहे. यासाठी कुठे आणि कसं रजिस्ट्रेशन करायचं याबाबत सरकारकडून लवकरच सूचना जारी केल्या जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचं बजेट मांडण्यात आलं. या बजेटमध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-