महाराष्ट्र मुंबई

मुलाच्या लग्नानंतर आता राज ठाकरे लावणार 500 आदिवासी जोडप्यांचं लग्न!

पालघर | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालघर जिल्ह्यातील 500 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाहसोहळा आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे उपस्थित राहणार आहे.

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं फॅशन डिझायनर मिताली बोरुडे हिच्याशी लग्न झालं. हा विवाहसोहळा गेल्याच महिन्यात म्हणजे 27 जानेवारीला पार पडला. 

मात्र आता या लग्नाच्या धावपळीतून निवांत झालेले राज ठाकरे पुन्हा लग्नाच्या धावपळीत अडकणार आहे. येत्या 9 तारखेला पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील खैरेपाडा मैदानात हा सामूहिक विवाहसोहळा पार पडणार आहे. 

दरम्यान, या सामूहिक विवाहसोहळ्यात आदिवासी समाजातील 500 जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-‘नरेंद्र मोदी मुर्दाबाद’ घोषणा देऊ नका; राहुल गांधींच्या सूचना

‘भाजप नेते’ हल्ला करतील या भीतीने पत्रकारांनी डोक्यात घातलंय हेल्मेट!

नरेंद्र मोदींना स्टेजवर माझ्यासमोर 5 मिनिटं उभं करा; राहुल गांधींचं भाजपला आव्हान

आता तुम्हालाही होता येणार मोदी!, भाजपने आणला ‘मोदींचा मुखवटा’

-“वो मंदिर नही, सरकार बनाना चाहते है”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या